आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hathras Rape Case : The Decision To Bury The Night Was Mine, Not Government Pressure; Hathras Collector's Explanation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाथरस प्रकरण:रात्री अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय माझा होता, सरकारचा दबाव नव्हता; हाथरस जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

लखनऊ/हाथरस3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पीडितेचे कुटुंबीय सकाळी हाथरसहून लखनऊत दाखल झाले. - Divya Marathi
पीडितेचे कुटुंबीय सकाळी हाथरसहून लखनऊत दाखल झाले.
  • एखाद्या श्रीमंताची मुलगी असती तर तुम्ही असेच केले असते का? कोर्टाचा प्रशासनाला सवाल

हाथरस प्रकरणात पीडित कुटुंबीय सोमवारी कडक सुरक्षा व्यवस्थेत लखनऊ हायकोर्टात साक्ष नोंदवण्यासाठी हजर झाले. न्या. पंकज मित्तल यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायमूर्तींच्या पीठाने कुटुंबाच्या अनुपस्थितीत पीडितेवर झालेल्या अंत्यसंस्कार प्रकरणाची सुनावणी केली. हाथरसचे जिल्हाधिकारी प्रवीणकुमार लक्षकार यांनी जबाबदारी घेताना सांगितले की, काही लोक स्वार्थासाठी लोकांना भडकावून जातीय हिंसाचार करण्याचा प्रयत्न करू शकतात, त्यामुळे कायदा-सुव्यवस्था बिघडू शकते, अशी गोपनीय माहिती मिळाली होती. अंत्यसंस्काराला आणखी उशीर झाला असता तर मृतदेह कुजण्याची शक्यता होती. त्यामुळे मध्यरात्रीच अंत्यसंस्कार केले. यासाठी माझ्यावर सरकार किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कुठलाही दबाव नव्हता. त्यावर, ‘एखाद्या श्रीमंताची मुलगी असती तर तुम्ही असेच केले असते का? कायदा-सुव्यवस्था बिघडण्याची भीती होती तर सुरक्षा आणखी वाढवता आली असती,’ अशा शब्दांत कोर्टाने प्रशासनाला फटकारले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser