आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
हाथरस दरम्यान पुन्हा एकदा महिलांवर होणाऱ्या अत्याचार आणि बलात्काराच्या चर्चा वाढल्या आहेत. मात्र महिलांची सर्वात मोठी समस्या घरगुती हिंसा आहे. जर आकड्यांमध्ये पाहिले तर महिलांच्या अत्याचारातील प्रत्येकी तिसरे प्रकरण (एकूण प्रकरणांचे 31%) घरगुती हिंसेसंबंधीत आहे.
एनसीआरबी म्हणजेच नॅशनल क्राइम रिकॉर्ड्स ब्यूरोच्या क्राइम्स इन इंडिया 2019 च्या रिपोर्टनुसार महिलांवर होणारे अत्याचार 2018 ते 2019 मध्ये 7.3% वाढले आहेत. 2019 मध्ये महिलांविरोधातील अत्याचाराचे 4,05,861 केस दाखल झाले, तर 2018 मध्ये 3,78,236 केस दाखल झाल्या होत्या. अशाप्रकारे एक लाख महिलांविरोधात झालेल्या अत्याचारांचा रेट 62.4% राहिला, जो 2018 में 58.8% होता.
घरगुती हिंसा वाढतेय
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांमध्ये बलात्काराचे प्रकरणे गेल्या काही वर्षांमध्ये कमी झाले आहेत, घरगुती हिंसांच्या प्रकरणामध्ये सातत्याने वाढ होत आहे. 2018 मध्ये पती आणि नातेवाईकांच्या अत्याचारासंबधीत घरगुती हिंसेचे एकूण प्रकरण एक लाख चार हजार 165 होते. जे 2019 मध्ये वाढून एक लाख 26 हजार 575 झाले आहेत. म्हणजे 21% पर्यंत वाढ झाली आहे.
घरगुती हिंसाचाराच्या प्रकरणांमुळे न्यायालयांचे ओझे वाढत आहेत
एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार कळाले आहे की, कोर्टात केसचे सर्वात मोठे ओझे घरगुती हिंसेसंबंधीत आहेत. 2018 मध्ये जवळपास दीड लाख केसमध्ये पोलिस तपास पेडिंग होता, जे 2019 मध्ये कमी करुन 54 हजारपर्यंत आणण्यात आले होते. मात्र कोर्टात केस वाढतच गेल्या. 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये जवळपास 30 हजार केस पेडेंसी वाढली. 2018 मध्ये 5.39 लाख केस पेडिंग होत्या, 2019 मध्ये या वाढून 5.70 लाख झाल्या. कन्विक्शन रेटही खूप कमी आहे. 2018 मध्ये जेछे 13% प्रकरणांमध्ये दोष सिद्ध झाला होता, जो 2019 मध्ये वाढून 14.6% झाला आहे.
लॉकडाउनमध्येही वाढला महिलांवरील अत्याचार
महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती ईरानी यांनी लोकसभेमध्ये 23 सप्टेंबरला दिलेल्या उत्तरात सांगितले की, लॉकडाउनदरम्यान मार्च ते 20 सप्टेंबरपर्यंत महिलांविरोधातील अत्याचाराच्या 13,410 तक्रारी सरकारला मिळाल्या आहेत. यामध्ये सर्वात जास्त 5,470 तक्रारी उत्तरप्रदेशातून आल्या आहेत. यानंतर दिल्ली (1,697), महाराष्ट्र (865) आणि हरियाणा (731) मधून तक्रारी आल्या आहेत. मंत्रालयाने अशा प्रकारच्या प्रकरणांची सूचना देण्यासाठी व्हॉट्सअप नंबर 7217735372 जारी केला होता. ज्यावर 10 एप्रिल ते 20 सप्टेंबरपर्यंत 1,443 प्रकरणे समोर आले.
महिलांविरोधात प्रत्येकी तिसरा गुन्हा कौटुंबिक हिंसेचा
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.