आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एफडी आणि आरडीच्या व्याजदरांत वाढ:एचडीएफसी बँकेने एफडी-आरडीचे व्याज दर वाढवले

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एचडीएफसी बँकेने मुदत ठेवी (फिक्स्ड डिपॉझिट) आणि आवर्ती ठेवीवरील (रिकरिंग डिपॉझिट) व्याजाचे दर वाढवले आहेत. एचडीएफसी बँकेने एफडी आणि आरडीच्या व्याजदरांत आता ०.४०% वाढ केली आहे. नवीन व्याजदर १८ ऑगस्टपासून लागूही करण्यात आले आहेत.

याआधी एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कोटक महिंद्रा बँक, उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेनेही व्याजदरांत वाढ केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट वाढवला होता. यानंतर बँकांनी कर्जाच्या व्याजदरासह मुदत ठेवींवरील व्याजदरांतही वाढ करणे सुरू केले होते.

बातम्या आणखी आहेत...