आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल वीज यांचा काँग्रेसवर निशाणा:म्हणाले - कमकुवत मनाचे पंतप्रधान नेहरूंचा नाही तर सिंहाचं हृदय असलेल्या मोदींचा ​​​​​​​हा भारत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अरुणाचल प्रदेमधील तवांग सेक्टरमध्ये चिनी सैन्याच्या घुसखोरीचा डाव भारतीय जवानांनी उधळून लावला. चीनच्या घुसखोरीला रोखताना दोन्ही बाजूने संघर्ष झाला. यामध्ये दोन्ही बाजूचे सैन्य जखमी झाल्याचे वृत्त आहे. यावरुन आता राजकीय वाद पेटला आहे. हरियाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी भारत आणि चीनच्या सैनिकांमधील ताज्या संघर्षावरून माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तत्कालीन सरकारवर निशाणा साधला आहे.

अनिल विज यांनी ट्विटरवर लिहिले की, "चीनी लोकांनो सावध राहा. हा 1962 च्या कमकुवत मनाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंचा भारत नाही. तर 2022 च्या सिंहाचं हृदय असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भारत आहे.

काँग्रेसचे मोदी सरकारवर आरोप

अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरुन काँग्रेसने टीका केली आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, भारतीय लष्कराच्या शौर्याचा आम्हाला अभिमान आहे. सीमेवर चीनच्या कारवाया कोणत्याही प्रकारे मान्य केल्या जाणार नाहीत. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही भारतीय लष्कराच्या शौर्याचा अभिमान बाळगत आहोत. वारंवार सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, मोदी सरकार केवळ आपली राजकीय प्रतिमा वाचवण्यासाठी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे चीनचा उद्धटपणा वाढत आहे.

भारताची एक इंचही जमीन कोणी बळकावू शकत नाही

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. आज देशात भाजपचे सरकार आहे. जोपर्यंत आपले सरकार आहे, तोपर्यंत देशाची एक इंचही जमीन कुणीही बळकावू शकत नाही. 8 तारखेच्या रात्री आणि 9 तारखेला सकाळी आपल्या सैन्याच्या जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे मला कौतुक वाटते. सैन्याने काही वेळातच घुसखोरांचा पाठलाग केला आणि भूमीचे रक्षण केले,अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रतिक्रिया दिली. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तवांग चकमकीवर संरक्षणमंत्र्यांचे 3 मिनिटांचे उत्तर

अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ म्हणाले- 9 डिसेंबर 2022 रोजी PLAच्या जवानांनी तवांगमध्ये एलएसीचे उल्लंघन करून नियम तोडले. भारतीय लष्कराने पीएलएला अतिक्रमण करण्यापासून रोखले. त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

तवांग चकमकीनंतर चीनविरोधात फायटर प्लेन तैनात

तवांगमध्ये भारत-चीनच्या सैनिकांत हिंसक चकमक झाल्यानंतर भारतीय हवाईदलाने (IAF)अरुणाचलच्या सीमेवर कॉम्बॅट एअर पेट्रोलिंग अर्थात युद्ध उड्डाणांना सुरुवात केली आहे. 9 डिसेंबर रोजी तवांगमध्ये झालेल्या चकमकीपूर्वीही चीनने अरुणाचलच्या हद्दीत आपले ड्रोन पाठवण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर IAFने तत्काळ या भागात आपली लढाऊ विमाने तैनात केली होती.

एएनआयने सूत्रांचा दाखला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, तवांगलगतच्या यांगत्सेमध्ये LAC निकटच्या होलीदीप व गस्ती भागातील भारतीय पोस्टला चीनचा विरोध आहे. मागील काही आठवड्यांत 2-3 वेळा या चौक्यांच्या दिशेने येणाऱ्या चिनी ड्रोनला भारतीय लढाऊ विमानांनी पिटाळून लावले. सुखोई-30MKI ने हे हवाई उल्लंघन रोखले होते. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

चीनच्या 600 सैनिकांना बहाद्दर भारतीय जवानांनी पिटाळले!

पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात सुमारे अडीच वर्षापूर्वी प्रथम घुसखोरी करणाऱ्या चीनने आता अरुणाचल प्रदेशात त्याचाच कित्ता गिरवला. भारताने त्याला सडेतोड उत्तर दिले. चीनी लष्कराचे सुमारे ६०० सैनिक यांगत्सेमध्ये जमले होते. चीन सैनिक या ठिकाणी तारांचे कुंपण बांधण्याच्या हेतून आले होते. भारतीय जवानांनी त्याला विरोध करताच चीनी सैनिकांनी वायरचे कटर आणि लोखंडांच्या इतर अवजारांनी भारतीय जवानांवर हल्ला केला. यावेळी उडालेल्या चकमकीत १० ते १५ भारतीय जवानांना किरकोळ दुखापत झाली. मात्र चीनचे ५० सैनिक प्रचंड रक्तबंबाळ अवस्थेतच माघारी फिरले. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...