आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • He Said Rahul Will See The Sky high Ram Temple In Ayodhya, If There Was Congress, Such A Grand Temple Would Not Have Been Built

अमित शहांचा काँग्रेसवर हल्लाबोल:म्हणाले- राहुल यांना अयोध्येत गगनचुंबी राम मंदिर दिसेल, काँग्रेस असती तर एवढे भव्य मंदिर बांधले नसते

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी हिमाचलच्या नादौन विधानसभेत भाजप उमेदवार विजय अग्निहोत्री यांचा प्रचार केला. यादरम्यान शाह यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. एका बाजूला कुटुंबवादाने ग्रासलेला काँग्रेस पक्ष आहे. दुसरीकडे पीएम मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप आहे, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

डबल इंजिन सरकारने हिमाचल प्रदेशात काम केले आहे. हे काम असेच पुढेही जारी राहणरा आहे. या निवडणुकीत जयराम सरकार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा सरकार स्थापन होणार आहे. काँग्रेसवाले त्यांच्या काळात केलेल्या कामाचा हिशोब देत नाहीत. पण मी हिमाचल आणि केंद्र सरकारच्या डबल इंजिन सरकारचा हिशेब द्यायला आलो आहे. काँग्रेसला 40 वर्षांत वन रँक वन पेन्शन का देता आली नाही, असा सवाल शाह यांनी केला. तसेच भाजप आल्यावरच ते शक्य झाल्याचेही ते म्हणाले.

राहुल यांनी अयोध्येत राम मंदिर पाहावे
आपल्या भाषणात अमित शहा यांनी राहुल गांधींच्या पदयात्रेचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, अयोध्येत राम मंदिर व्हावे अशी प्रत्येकाची इच्छा होती, पण तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे काँग्रेस पक्षाला राम मंदिर बांधायचे नव्हते. तिथे मंदिर बांधणार, पण तारीख सांगणार नाही, असे ते म्हणत. आता राहुल आयोध्येत गेले तर त्यांना गगनचुंबी मंदिर दिसेल. काँग्रेस असती तर एवढे भव्य मंदिर बांधले नसते. काँग्रेसचे नेते फक्त बोलतात, असे म्हणत त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

हिमाचलचे पुत्र सीमेवर
हिमाचलमधील मातांनी आपल्या मुलांना देशाच्या रक्षणासाठी सीमेवर पाठवले. या शूर मातांना मी नमन करतो. हिमाचलची मुले देशाच्या सुरक्षेसाठी काम करतात, आपल्या प्राणांची आहुती देतात. परमवीर चक्र प्राप्त करणारा पहिला शहीद हिमाचलचा आहे, असे शाह यांनी सांगितले.

कलम 370 वरून काँग्रेसवर टीका
कलम 370 हटवण्याचा मुद्दा संसदेत आल्यानंतर काँग्रेसने कायम विरोध केला. पण, मोदींच्या नेतृत्वात भाजपने 370 हटवले. आज संपूर्ण जगात भारताचा डंका वाजत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाचे डोके उंचावले आहे. भारताचा मान वाढला आहे. भारताचे सैन्य आणि त्याच्या सीमेवर छेडछाड होऊ शकत नाही. छेडछाड केल्यास किंमत मोजावी लागेल, हे आता जगाला कळून चुकले आहे.

हिमाचलमध्ये 12 नोव्हेंबरला मतदान

हिमाचल प्रदेश विधानसभेसाठी 12 नोव्हेंबर रोजी एका टप्प्यात निवडणूक होणार आहे. त्यानंतर 8 डिसेंबर रोजी निकाल घोषित होईल. निवडणूक आयोगाने शुक्रवारी ही घोषणा केली. हिमाचल विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी 3 जानेवारी रोजी संपुष्टात येत आहे.​​​​​​​ येथे वाचा पुर्ण बातमी

बातम्या आणखी आहेत...