आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • He Who Says That Muslims Should Not Live In India Is Not A Hindu Mohan Bhagwat; News And Live Updates

गाझियाबाद:मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू नाही - मोहन भागवत; मुस्लिम राष्ट्रीय मंचावरून सरसंघचालकांचे वक्तव्य

गाझियाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा.

भारतात इस्लाम धोक्यात आहे या भीतीच्या जाळ्यात फसू नका, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुस्लिमांना केले. ते म्हणाले, ‘हिंदू-मुस्लिम एकतेला वेगळे वळण लावले जात आहे, पण दोन्ही वेगवेगळे नाहीत, तर एकच आहेत. सर्व भारतीयांचा डीएनए एक आहे, भलेही ते कोणत्याही धर्माचे असोत. आपण लोकशाहीत राहतो. येथे हिंदू किंवा मुस्लिमांचे प्रभुत्व राहू शकत नाही, फक्त भारतीयांचे प्रभुत्व असू शकते. मुस्लिमांनी भारतात राहू नये असे जो म्हणतो तो हिंदू असू शकत नाही.’ भागवत रविवारी मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या ‘हिंदुस्तानी पहले, हिंदुस्तान पहले’ कार्यक्रमाला संबोधित करत होते.

भागवत म्हणाले, ‘पूजा करण्याच्या पद्धतीच्या आधारावर लोकांमध्ये फरक केला जाऊ शकत नाही.’ त्यांनी जमावाद्वारे मारहाण करून हत्येत (लिंचिंग) सहभागी लोकांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘असे लोक हिंदुत्वविरोधी आहेत. तथापि, असाही एक काळ होता, जेव्हा काही लोकांविरुद्ध लिंचिंगचे खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. देशात एकतेशिवाय विकास शक्य नाही. राष्ट्रीयत्व आणि पूर्वजांचा गौरव हा एकतेचा आधार असायला हवा.

हिंदू-मुस्लिम यांच्यातील वादांवर चर्चा हाच एकमेव तोडगा आहे, मतभेद नव्हे.’ कार्यक्रमाच्या सुरुवातीला भागवत म्हणाले की, ‘आम्ही या कार्यक्रमात आपली प्रतिमा निर्माण करण्यासाठी किंवा व्होट बँकेचे राजकारण करण्यासाठी सहभागी झालेलो नाही. संघ ना कधी राजकारणात होता, ना त्याला आपली प्रतिमा तयार करण्याची चिंता आहे. संघ देशाला मजबूत करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक वर्गाच्या कल्याणासाठी काम करत असतो.’

बातम्या आणखी आहेत...