आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Health Budget 2022 | 8% Of The Budget Will Be Spent On Health; The Agenda For The Central Council Of The Ministry Of Health Is Fixed | Marathi News |

दिव्य मराठी विशेष:बजेटचा 8% खर्च आरोग्यावर होणार; आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिलसाठी अजेंडा निश्चित

​​​​​​​पवनकुमार | नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या राज्यांत बजेटचा सरासरी 5.26% खर्च आरोग्यावर होत आहे

देशात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी सर्व राज्य सरकारांना त्यांच्या अर्थसंकल्पाच्या ८% भाग आरोग्यावर खर्च करण्यास सांगितले जाईल. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सेंट्रल कौन्सिलची बैठक २१ ते २३ एप्रिलपर्यंत गुजरातच्या केवडियात होणार आहे. यात राज्यांसोबत मिळून आराखडा तयार करण्यात येणार आहे. वित्त वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पानुसार, देशातील २१ छोट्या-मोठ्या राज्यांनी मिळून आपल्या अर्थसंकल्पाची केवळ ५.२६% (२,३६,४३८ कोटी) रक्कम आरोग्यावर खर्च केली. सरकारने या बजेटचा ८% खर्च आरोग्यावर केला तर सुमारे सव्वा लाख कोटी रुपयांनी राज्यांचा वाटा वाढून जाईल. वित्त वर्ष २०२१-२२ मध्ये केंद्राने एकूण बजटचा फक्त २.५२% खर्च आरोग्यावर केला आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्र नेटवर्कचा विस्तार
राज्य आरोग्य बजेट %

बिहार 13,012 5.96
दिल्ली 9,934 14.39
हिमाचल 2,976 5.92
हरियाणा 7,317 4.70
पंजाब 4,662 2.77
झारखंड 4,445 4.86
मध्य प्रदेश 11,619 4.94
राजस्थान 16,269 6.48
छत्तीसगड 5,902 5.75
महाराष्ट्र 19,060 3.93
गुजरात 11,304 5.06

(सूचना : वित्त वर्ष 2021-2022 च्या अर्थसंकल्पानुसार)

देशातील मागास भाग, तालुके व गावांत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याचा आराखडा तयार केला जाईल. राज्य पातळीवर पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट केडर उभारले जाईल. खासगी क्षेत्राला आमंत्रित केले जाईल. जेणेकरून दुर्गम भागांत रुग्णालये आणि दवाखान्यांची संख्या वाढवता येईल. तेथे सवलतीच्या दरात सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. तज्ज्ञ डॉ. चंद्रकांत लहारिया म्हणाले, असे झाले तर सरकारला आरोग्य क्षेत्रातील रिक्त पदांची भरती व सध्याच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नवी पद तयार करण्यात मदत मिळेल.

बातम्या आणखी आहेत...