आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Health department issue new guidelines for restaurant religious places and malls hotel reopening in unlock 1 news and updates

अनलॉक-1 :रेस्तराँत निम्म्या सीट्स रिकाम्या, मंदिरात घंटा वाजवण्यास मनाई; मॉलमधील दुकाने उघडता येणार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जूनपासून रेस्तराँ-धर्मस्थळ-मॉल-हॉटेल उघडण्यासाठी केंद्राची एसओपी

अनलाॅक-१ अंतर्गत देशातील मोठ्या भागात ८ जूनपासून रेस्तराँ, धार्मिक स्थळे, माॅल्स व हाॅटेल्स उघडता येतील. यासाठी केंद्राने गुरुवारी स्टँडर्ड अाॅपरेटिंग प्राेसिजर (एसअाेपी) जारी केली. रेस्तराँत निम्म्या सीट्स रिकाम्या सोडाव्या लागतील. धार्मिक स्थळी प्रसाद वाटप व घंटी वाजण्यास मनाई असेल. मॉल्समध्ये मुलांच्या खेळण्याची जागा बंद ठेवावी लागेल. हॉटेल्समध्ये फक्त डिजिटल पेमेंट करण्यास सांगितले आहे.


रेस्तराँ : मेन्यू कार्डही डिस्पोजेबल

>  बसून खाण्याऐवजी ‘टेक अवे’ला उत्तेजन दिले जाईल. हाेम डिलिव्हरी करणारे कर्मचारी पॅकेट दरवाजाबाहेर ठेवतील.

>  एंट्री गेटवर हात सॅनिटाइझ करणे व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था असेल. वेगवेगळ्या वेळी थाेडे-थाेडे कर्मचारी बोलावले जातील. काेराेनापासून बचावाच्या उपायांचे अाॅडिअाे-व्हिडिओ मेसेज दिले जातील.

>  व्हॅले पार्किंगची सुविधा असल्यास गाडीचे स्टिअरिंग, डाेअर हँडल, चावी आदी संपूर्णपणे निर्जंतुक केली जाईल.

>  डिस्पाेजेबल मेन्यू कार्ड वापरावे लागतील. कपड्यांच्या नॅपकिनएेवजी डिस्पाेजेबल पेपर नॅपकिन असतील. नवीन ग्राहक बसण्याच्या पूर्वीच टेबल सॅनिटाइझ केला जाईल.

धर्मस्थळे : मूर्तींना स्पर्श करता येणार नाही

>  मास्कविना प्रवेश मिळणार नाही. मोजक्या भाविकांना वेगवेगळ्या वेळी प्रवेश दिला जाईल. साबणाने हातपाय धुवावे लागतील.

>  बूट-चप्पल वाहनातच सोडावे लागतील. अन्यथा बाहेर रॅकवर ठेवावे लागतील.

>  रांगेत फिजिकल डिस्टन्सिंगनेच उभे राहावे लागेल. येण्याजाण्याचे मार्ग वेगळे असतील.

>  मूर्ती व ग्रंथांना स्पर्श करता येणार नाही. घंटाही वाजवता येणार नाही. इतकेच नव्हे तर भजनी मंडळांवरही बंदी असेल.

>  मंदिरात बसून पूजा करण्यासाठी भाविकाला आपल्या घरूनच चटई घेऊन यावी लागेल.

>  प्रसाद वाटप, तीर्थ शिंपडण्यास बंदी असेल. सामुदायिक भोजन, लंगर, अन्नदान आदी फिजिकल डिस्टन्सिंगनेच करता येईल.


माॅल : एसी २४-३० डिग्री, तर ह्यूमिडिटी ४०-७०% ठेवा

>  कोणत्याही दुकानात मर्यादित ग्राहकांना प्रवेश द्यावा लागेल. 

>  पार्किंग व माॅल परिसराबाहेर गर्दी आवरण्यासाठी व्यवस्थापनाला योग्य व्यवस्था करावी लागेल.  

>  एलिव्हेटरमध्येही मर्यादित प्रवेश द्यावा लागेल. 

>  फूड काेर्टमध्ये निम्म्यापेक्षा जास्त सीट्स रिकाम्या ठेवाव्या लागतील. 

>  लोकांचा एकमेकांशी कमीत कमी संपर्क येईल, अशी ऑर्डर व पेमेंट व्यवस्था ठेवावी लागेल.


हाॅटेल: डिजिटल पेमेंट होणार 

>  कॉन्टॅक्टलेस चेक-इन व चेक-आउटची व्यवस्था करावी लागेल. गेस्टचे लगेज रूममध्ये ठेवण्यासाठी ते सॅनिटाइझ करावे लागेल. 

>  गेस्टसाठी रूम सर्व्हिस असेल, मात्र सर्व संवाद रूममधील फोन किंवा मोबाइलवरूनच करावा लागेल.

0