आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:देशभरात डझनभर मेडिकल कॉलेजांवर आरोग्य खात्याचे छापे; महाविद्यालयांविरोधात तक्रारी वाढल्यानंतर कारवाई

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात पहिल्यांदाच आरोग्य खात्याने डझनभर मेडिकल कॉलेजांवर सर्जिकल स्ट्राइकची (छापे) कारवाई केली. या महाविद्यालयांच्या विरोधातील तक्रारी वाढल्यानंतर ही कारवाई केल्याचे सांगितले जाते. परंतु छाप्यांबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. त्याबद्दल वैद्यकीय शिक्षण विभागालाही काहीही माहिती झाले नाही. या कारवाईबद्दल निवडक अधिकाऱ्यांनाच कल्पना होती. आतापर्यंत मेडिकल कॉलेजांवर नॅशनल मेडिकल कमिशन (एनएमसी), मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) या संस्था कारवाया करत असत.

परंतु कोरोनाच्या काळात एनएमसी कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार दरवर्षी फिजिकल इन्स्पेक्शनची गरज नसल्याची तरतूद करण्यात आली. मेडिकल कॉलेजव्यतिरिक्त इतर महाविद्यालयांनाही यापुढे पाच वर्षांत एकदा प्रत्यक्ष पडताळणीचा नियम तयार करण्यात आला आहे. अनेक मेडिकल महाविद्यालयांबद्दलच्या तक्रारी मंत्रालयाकडे आल्या होत्या. या तक्रारींचा मंत्रालयाच्या पातळीवर तपास करण्यात आला. त्यानंतर देशभरात केंद्रीय रुग्णालयांतील ३ ते ६ डॉक्टरांच्या वेगवेगळ्या टीम तयार करण्यात आल्या. संपूर्ण माहिती लपवून ठेवण्यात आली. या कारवाईची निगराणी आरोग्यमंत्री मनसुख मांडविया करत होते.

बातम्या आणखी आहेत...