आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Health Experts To Pm Modi Unplanned Vaccination Can Promote Mutant Strains No Need To Inoculate Those Who Have Had Coronavirus Infection, It Is Unlikely That Mass Vaccination Of All Adults Will Catch Up With The Pace Of Natural Infection Among Our Young Population

लसीकरणावर मोदींना सल्ला:या परिस्थितीत तरुण आणि मुलांना लस देणे योग्य ठरणार नाही; ज्यांना कोरोना होऊन गेला , त्यांनाही तात्काळ लसीची गरज नाही

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • अंधाधुंद आणि अपुऱ्या लसीकरणातून कोरोनाचा नवीन स्ट्रेन तयार होऊ शकतो

अंधाधुंद आणि अपुऱ्या लसीकरणातून कोरोना व्हायरसचे नव-नवीन म्यूटेंट स्ट्रेन्स तयार होऊ शकतात. हा इशारा देशातील आरोग्य जाणकारांच्या एका समुहाने दिला आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींना सोपवलेल्या एका रिपोर्टमध्ये या जाणाकारांनी कोरोना होऊन गेलेल्या लोकांना तुर्तास लस देण्याची गरज नसल्याचेही म्हटले आहे.

या जाणकारांचे म्हणने आहे की, मोठ्या प्रमाणावर म्हणजेच, सरसकट सर्वांचेच लसीकरण करण्याऐवजी गरज असलेल्या नागरिकांनाच लस द्यावी. सध्याच्या परिस्थितीत तरुणांना आणि लहान मुलांना लस देण्याची गरज नाही. यामुळे इतर गरजवंतांना लस मिळण्यात अडचणी येत आहेत. या जाणाकारांच्या समुहात AIIMS चे डॉक्टर आणि कोविड-19 नॅशनल टास्क फोर्सचे मेंबर सामील आहेत.

इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन (IPHA), इंडियन असोसिएशन ऑफ एपिडमोलॉजिस्ट्स (IAE) आणि इंडियन असोसिएशन ऑफ प्रीवेंटिव अँड सोशल मेडिसिन (IAPSM)च्या या जाणकारांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, "देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता तरुणांसह सरसकट सर्वांना लस देण्याऐवजी व्हॅक्सीनेशन पॉलिसी डेटाच्या आधारावर असावी."

जाणून घेऊया जाणकारांनी मोदींना काय सल्ला दिला...

1. लसीची कमतरता, तरुणांना तुर्तास लस देऊ नये : कोरोना महामारीच्या काळात सर्वांचे लसीकरण होणे गरजेचे आहे, पण लसीची कमतरता असल्यामुळे तरुणांचे लसीकरण तुर्तास थांबावावे. सध्याच्या परिस्थितीत वयोवृद्ध, आजारी व्यक्ती आदींना लस द्यावी. 2. लहान मुलांच्या लसीकरणाबाबत डेटा नाही : डेटाच्या आधारावर बोलायचे झाल्यावर लहान मुलांना लस देण्याची सध्या गरज वाटत नाही. लहान मुले आणि तरुणांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असल्यामुळे त्यांचे लसीकरण करण्याची सध्या गरज दिसत नाही. 3 .संक्रमणाचा वेग जास्त, लसीकरणाचा नाही: हेदेखील बरोबर आहे की, तरुणांना आत लसीची गरज नसली, पण लवकरच गरज भासणार आहे. यासाठी आपल्याला लसीची उपलब्धता आणि लसीकरणाचा वेग वाढवावा लागेल. 4. कोरोना झालेल्यांना लसीची गरज नाही : ज्यांना कोरोना होऊन गेला आहे, त्यांना सध्या लसीची गरज नाही. अशा रुग्णांच्या शरीरात नैसर्गिकरित्या अँटीबॉडी तयार झालेल्या असतात, त्यामुळे त्यांना जीवाच जास्त धोका नसतो. 5. व्हॅक्सीन शेड्यूल सुटसुटीत असावा :लस केंव्हा आणि किती दिवसांच्या अंतराने दिली जावी, हे त्या परिसरातील लोकसंख्या आणि संसर्गाच्या आधारावर ठरवले जावे. 6. नवीन व्हेरिएंट तयार होईल : अंधाधुंद आणि अपुऱ्या लसीकरणामुळे कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रत्येक जिल्ह्यात सीरो सर्व्हे व्हावा

 • रिपोर्टमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर प्रत्येक जिल्ह्यात रियल टाइम लोकल सीरो सर्व्हे करण्याचा सल्ला दिला आहे.
 • सीरो सर्व्हेमध्ये लोकांचे ब्लड सँपल घेऊन अँटीबॉडीजची तपासणी केली जावी.
 • यातून कळेल की, किती जणांनी लस घेतली आणि किती जणांच्या शरीरात लस घेतल्याशिवाय अँटीबॉडी तयार झाली.
 • अशा सीरो सर्व्हेतून कोरोनानंतर किती दिवसात रोगप्रतिकारशक्ती तयार झाली, दुसऱ्यांना संसर्क झाला का किंवा संसर्गाची गंभीरता तपासून भविष्यातील रणनिती तयार करण्यास मदत मिळेल.

सीरो सर्व्हेत 70% पॉझिटिव्ह आढळल्यास लॉकडाउन होऊ नये

एक्सपर्ट समुहाचे म्हणने आहे की, जिल्ह्यात नॅचुरल इंफेक्शन आणि व्हॅक्सीनेशन, दोन्ही कारणाने 70% सँपलमध्ये अँटीबॉडी (seroprevalence) आढळली असेल, तर अशा जिल्ह्यात लॉकडाऊन केला जाऊ नये. याशिवाय, या सर्व्हेतून कोणत्या जिल्ह्याला लसीकरणात प्राधान्य द्यावे हेदेखील कळेल.

जीनोम सिक्वेंसिंग 3% पर्यंत नेण्याची गरज

 • अनेक प्रकारचे कोरोना व्हॅरिएंट्स भारतातील दुसऱ्या लाटेस जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. तरीदेखील देशात 1% पेक्षा कमी पॉझिटिव्ह सँपलची जीनोम सिक्वेंसिंग झाली आहे. प्रती 1000 रुग्णांवरही याची टक्केवारी कमी आहे.
 • जानकारांचे मत आहे की, सध्याची परिस्थिती पाहता 5% पॉझिटिव्ह सँपल्सच्या जीनोम सिक्वेंसिंगचे टारगेट पूर्ण करणे अवघड आहे, पण कमीत कमी 3% पर्यंत जाण्याची गरज आहे.
 • रिपोर्टमध्ये 10 नॅशनल लॅबोरेटरीला मिळून SARS-CoV-2 जिनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या एकत्रित येण्याची कौतुक करण्यात आले आहे. पण, यात अजून 17 लॅबोरेटरीला जोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
बातम्या आणखी आहेत...