आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Union Health Minister Harsh Vardhan Said India Stands On Threshold Of Vaccinating Each And Every Indian Against COVID 19

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लसीकरणावर सरकारचा दावा:आरोग्य मंत्र्याचा दावा- सरकार सर्वच भारतीयांना लस देण्याच्या उंबरठ्यावर; आतापर्यंत 98 लाख लोकांनी घेतली लस

नवी दिल्ली5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लसी पुरवण्याची मोहिम वसुधैव कुटुंबकम आधारावर

भारताचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, सरकार आता सर्वच भारतीयांना लसीकरण करण्याचा उंबरठ्यावर उभा आहे. देशात सध्या आरोग्य आणि आर्थिक स्थिरतेला समान करण्यासाठी रणनीती आखत असून, यामुळे देशातील परिस्थिती झपाट्याने सुधारण्यास मदत होणार आहे.

आरोग्यमंत्री हे गुरूवारी 'कोरोना मॅनेजमेंट: एक्सपीरिएंस, गुड प्रॅक्टिस अँड वे फॉरवर्ड' या वर्कशॉपमध्ये बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, कठीण परिस्थितीमध्ये भारताने प्रती 10 लाख लोकसंख्येमागे मृत्यू दराचे प्रमाण जगात सर्वात कमी ठेवण्यात यशस्वी झाला आहे. भारताची ताकद ही आहे की, त्यांने पूर्ण सरकार आणि समाजाचा दृष्टिकोण स्विकारला. 135 कोटी लोकसंख्या असलेल्या देशाने सरकारच्या निर्देशांचे पालन केले. आम्ही जगातील सर्वात मोठ्या लसीकरण अभियानाला सुरुवात केली असून आतापर्यंत देशातील 98 लाख लोकांनी लसीकरण केले आहे.

लसी पुरवण्याची मोहिम वसुधैव कुटुंबकम आधारावर

हर्षवर्धन पुढे म्हणाले की, आमची इतर देशांना लस पुरवण्याची मोहिम वसुधैव कुटुंबकम यावर आधारित असून त्याअंतर्गत आम्ही सुमारे 24 देशांना लस पुरवली आहे. या कार्यशाळेत भारताव्यतिरिक्त अफगानिस्तान, बांग्लादेश, भूटान, मालदीव, मॉरिशस, नेपाळ, पाकिस्तान, सेशल्स आणि श्रीलंका या देशांचे आरोग्य सचिव उपस्थित होते.