आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Health Minister Harsh Vardhan Has Been Ousted From The Modi Cabinet , 11 Ministers Resign

मंत्रीपदावरुन यांना मिळाले श्रीफळ:आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना मोदी मंत्रिमंडळातून डच्चू, आतापर्यंत रमेश पोखरीयाल निशंक यांच्यासह 'या' 12 मंत्र्यांनी दिले राजीनामे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • विद्यमान 11 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी 39 मंत्र्यांना सामिल करु शकतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी सहा वाजता मंत्रिमंडळाचा विस्तार करतील. आज एकूण 43 मंत्री शपथ घेतील. यापैकी 24 नवीन नावे निश्चित करण्यात आली आहेत. नियमांनुसार मोदी मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 81 मंत्री असू शकतात. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री होते. या अर्थाने 28 मंत्र्यांना सामिल होण्याची शक्यता होती. विद्यमान 12 मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर मोदी 39 मंत्र्यांना सामिल करु शकतात. आज ज्या 43 मंत्र्यांना शपथ दिली जाईल, त्यांच्यामध्ये काही सध्याचे राज्यमंत्रीही असतील, ज्यांना कॅबिनेटमध्ये प्रमोट केले जाईल.

दुसरीकडे जुन्या मंत्र्यांच्या राजीनाम्याची प्रक्रियाही सुरू झाली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी राजीनामा दिला आहे. असे मानले जाते की देशातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या वेळी विस्कळीत झालेली आरोग्य सेवा त्यांच्या राजीनाम्याचे कारण बनले.

राजीनामा देणाऱ्या मंत्र्यांची नावे

 1. सदानंद गौड़ा
 2. रविशंकर प्रसाद
 3. थावर चंद गहलोत
 4. रमेश पोखरियाल निशंक
 5. हर्षवर्धन
 6. प्रकाश जावडेकर
 7. संतोष कुमार गंगवार
 8. बाबुल सुप्रियो
 9. संजय धोत्रे
 10. रत्तन लाल कटारिया
 11. प्रताप चंद सारंगी
 12. देबोश्री चौधरी

कॅबिनेट रीशफलमध्ये अनेक राज्य मंत्र्यांना प्रोमोट केले जाऊ शकते. यामध्ये अनुराग ठाकूर, जीके रेड्डी, मनसुख मांडवया, किरन रिजिजू, आरके सिंह, हरदीप सिंह पुरी आणि पुरुषोत्तम रुपाल यांच्या नावांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...