आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Health Minister Harsh Vardhan Said Perhaps The Worst Phase Of The Corona Epidemic Has Ended

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासादायक:आरोग्यमंत्री म्हणाले - 'देशात जानेवारीमध्ये लसीकरणाला होऊ शकते सुरुवात, कदाचित महामारीचा सर्वात वाईट काळ संपला आहे'

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात सध्या एकूण 8 लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या सर्व चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत.

भारतात जानेवारी महिन्यापासून कोरोना लसीचा पहिला डोस दिला जाणार असल्याचे संकेत केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिले आहेत. जानेवारीच्या कोणत्याही आठवड्यात आम्ही भारतात कोरोना लसीचा पहिला डोस देण्याच्या तयारीत आहोत, असे त्यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, भारतात कदाचित कोरोना महामारीचा सर्वात वाईट काळ संपला आहे. तसेच आठवड्याभरात भारत आपल्या नागरिकांना लस देण्याच्या स्थितीत असेल.

हर्षवर्धन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आमची पहिली प्राथमिकता लसींची सुरक्षा आणि परिणामकारकता आहे. आम्हाला यावर तडजोड करण्याची इच्छा नाही. मला वैयक्तिकरित्या वाटते की कदाचित जानेवारीच्या काही आठवड्यात आम्ही लसीकरणास सुरुवात करू.

भारतात सध्या एकूण 8 लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या सर्व चाचण्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. काही आगाऊ स्टेजवर आहेत तर काही शेवटच्या टप्प्यात आहेत. ऑक्सफोर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची लस कोविशिल्ड आहे. त्याची चाचणी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया करत आहे. या लसीच्या चाचणीचा तिसरा टप्पा चालू असून अंतिम टप्प्यात आहे. द भारताच्या ड्रग रेगुलेटर, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे आपत्कालीन वापरासाठी परवानगी मागितली आहे.

आपला रिकव्हरी रेट जगातील सर्वोत्तम आहे
हर्षवर्धन म्हणाले, 'काही महिन्यांपूर्वी देशात कोरोनाची 10 लाख सक्रिय प्रकरणे होती, ती आता जवळपास तीन लाखांवर आहे. संसर्गाची एक कोटी प्रकरणे झाली आहेत. यापैकी 95 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आपला रिकव्हरी रेट जगात सर्वाधिक आहे. मला वाटते की आपण ज्या समस्यांचा सामना केला त्या आता संपण्याच्या मार्गावर आहेत. इतका मोठा देश असूनही आपण इतर मोठ्या देशांपेक्षा चांगल्या स्थितीत आहोत. '

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser