आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Hearing In The Supreme Court Today The Review Petition Seeking Modifications Of Its Order Staying Jagannath Rath Yatra

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जगन्नाथ यात्रा:284 वर्षांत पहिल्यांदाच...संचारबंदीत निघेल भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा, सर्वोच्च न्यायालयाने दिली सशर्त परवानगी

भुवनेश्वर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुप्रीम कोर्टाने 18 जूनला म्हटले होते - कोरोनाच्या काळात यात्रा निघाली तर देव जगन्नाथ आपल्याला माफ करणार नाही
  • पुरी पीठचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद म्हणाले - वर्षानुवर्षांची परंरपार मोडली तर देव माफ करतील का?

कोरोनादरम्यान ओडिशातील पुरीत मंगळवारी भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा निघेल. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी आपला ४ दिवसांपूर्वीचा निर्णय बदलत रथयात्रेला सशर्त परवानगी दिली. न्यायालयाने राज्य सरकारला भाविकांच्या सहभागावर बंदी आणि पुरीत संचारबंदीसह ११ निर्देश दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने पुरीत सोमवारी रात्री ९ वाजेपासून बुधवारी दुपारी २ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली आहे. २८४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा भगवान जगन्नाथ यांची रथयात्रा संचारबंदीत निघेल. यात्रेत सहसा सुमारे २० लाख लोक सामील होतात, मात्र या वेळी ही संख्या दोन हजारांपर्यंत राहील. 

सर्वोच्च न्यायालयानेे पुरीत यात्रा समारंभादरम्यान विमानतळ, रेल्वे-बसस्थानकासह प्रवेशाचे सर्व मार्ग बंद करण्याचे आदेश दिले आहेत. सरन्यायाधीश एस. ए. बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सांगितले की, रथयात्रा परंपरेनुसार पूर्ण करण्यासाठी कमीत कमी लोकांना परवानगी दिली जावी. प्रत्येक रथ ओढण्यासाठी ५०० पेक्षा जास्त लोक नेमू नयेत. कोरोना तपासणी निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांना रथ आेढण्याची परवानगी मिळेल. रथ एक-एक तासाच्या अंतराने काढले जावेत. त्यांना ओढणाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे. हा निर्णय पुरीच्या यात्रेसाठी आहे, राज्यासाठी नाही, असे कोर्टाने स्पष्ट केले आहे.

केंद्राचा युक्तिवाद, आताच जगन्नाथ निघाले नाहीत तर १२ वर्षे निघू शकणार नाहीत

केंद्राच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले, जर भगवान जगन्नाथ मंगळवारी निघाले नाहीत तर १२ वर्षे निघू शकणार नाहीत. हा कोट्यवधी लोकांच्या अास्थेचा विषय आहे. शतकांची परंपरा रोखता येऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...