आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णबने हाय कोर्टात जामीन अर्ज फेटाळल्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यावर न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठाची सुनावणी होणार आहे. तसेच, अर्णबच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारने एक कॅविएट दाखल करुन म्हटले की, त्यांची बाजू ऐकून घेतल्याशिवाय कोणताही आदेश जारी करू नये.
2018 मध्ये इंटीरियर डिझायनर अन्वय नाइक आणि त्यांच्या आईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करण्याच्या प्रकरणात रायगड पोलिसांनी अर्णब आणि इतर दोन लोकांना 4 नोव्हेंबरला अटक केली होती. यानंतर त्याला 18 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवले होते. अर्णब सध्या तळोजा तुरुंगात आहे.
अर्णबविषयी गृहमंत्र्यांना भेटले राम कदम
भाजप आमदार राम कदम यांनी मंगळवारी अर्णब गोस्वामीच्या अटकेविषयी गृहमंत्री अनिल देखमुखांची भेट घेतली. त्यांनी एक पत्र सोपवले ज्यामध्ये अर्णबच्या विरोधात 'सुडाच्या भावनेने' कारवाई करणाऱ्या पोलिसांचा योग्य तपास करण्याचे आदेश देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
पत्रामध्ये लिहिले आहे की, 'अटक करत असताना अर्णबसोबत गैरव्यवहार करण्यात आला आणि त्याला मारहाण करण्यात आली. ज्या पोलिसांनी अर्णबला मारहाण केली, ते सूडाच्या भावनेने कारवाई करत आहे. अर्णबसोबत गैरव्यवहार झाल्याने जनता नाराज आहे. या चुकीच्या कारवाईने संपूर्ण देश व्यथित आहे.'
निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल
कोकण विभागाचे पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी मीरा भाईंदर वसई विरार आयुक्त सदानंद दाते यांना पत्र लिहून आत्महत्येप्रकरणी चौकशीत सहभागी असणार्या इंस्पेक्टर सुरेश वराडे यांच्यावर कारवाईची शिफारस केली आहे. सोमवारी हे पत्र मिळाल्यानंतर वराडे यांना समन्स बजावण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. वराडे यांनी अलिबाग पोलिस स्टेशनमध्ये आत्महत्या प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
बनावट टीआरपी प्रकरणात घनश्याम सिंहला अटक
दरम्यान, मंगळवारी रिपब्लिक टीव्ही वितरण प्रमुख घनश्याम सिंह यांना मुंबई टीआरपी हेरफेर प्रकरणात अटक करण्यात आली. सिंह हे रिपब्लिक मीडिया नेटवर्कचे सहाय्यक असिस्टेंट व्हाइस प्रेसिडेंट आहेत. सिंह यांच्या अटकेसह या प्रकरणात आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.