आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका 35 वर्षीय व्यक्तीचा गरबा डान्स करताना अचानक मृत्यू झाला. 20 वर्षीय नवरीचाही वराला वरमाळ घालताना अचानक कोसळून मृत्यू झाला. एवढेच नाही तर मित्रांच्या गळ्यात हात टाकून फिरणाऱ्या एका तरुणाचाही असाच अचानक मृत्यू झाला. या सर्वांचा मृत्यू हृदयविकाराचा धक्का किवा कार्डियक अरेस्टने झाला.
अशा प्रकारचे विविध व्हिडोओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहून देशभरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनांमागे कोरोना व्हायरसमुळे तर होत नाही ना? असा प्रश्न सर्वांना पडला. आता अचानक होणाऱ्या या मृत्यूंवर हृदयविकार तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे.
अचानक होणाऱ्या मृत्युंचा कोरोनाशी संबंध
एम्समधील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर राकेश यादव म्हणाले, 'अचानक कार्डियक मृत्यू झालेल्या घटनांचा सध्या कोणताही डेटा उपलब्ध नाही. पण पुढे येणाऱ्या घटनांना पाहून त्याचा संबंध कोरोना महामारीशी असू शकतो असे वाटते.'
यादव व त्यांचे सहकाऱ्यांचा 2020 मध्ये इंडियन हार्ट जर्नलमध्ये (आयएचजे) एक लेख प्रकाशित झाला होता. त्यात त्यांनी कोरोनामुळे कोणत्याही सदृढ दिसणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असे नमूद केले होते. यात अनियमित हृदयगती व कमजोर हृदय मसल्सचा समावेश होता.
'हार्टसंबंधी आजारांच्या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष'
एम्सच्या प्रोफेसरनी सांगितले की, कालानुरुप संसर्गाचा इतिहास व हृदयाशी संबंधित आजारांच्या वाढत्या जोखमीचा संबंध दाखवणारे काही पुरावे उजेडात आलेत. ते म्हणाले, "माझी थेट सूचना आहे की, लोकांनी आपले वय व फिटनेसची काळजी न करता हृदयासंबंधी लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. आरोग्य संकटाची जोखीम कमी करण्यासाठी वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्याचा सल्लाही दिला जातो."
'अशा घटनांत शवविच्छेदन होणे आवश्यक'
एम्सच्या फॉरेन्सिक मेडिसीन व टॉक्सिकोलॉजीचे प्रोफेसर व प्रमुख डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या माहितीनुसार, हृदयरोग व अन्य जोखमीच्या कारणांमुळे तरुणांचा अचानक हृदयाशी संबंधित गुंत्यामुळे मृत्यू झाल्यास त्यांचे शवविच्छेदन करण्याची नितांत गरज आहे. त्यातून मृत्युचे खरे कारण जाणून घेण्यास मदत होईल.' याशिवाय मृत्यू एखाद्या अज्ञात हृदय आजाराने झाला असेल तर कुटुंबातील आजारांचा शोध घेण्यासाठी स्क्रीनिंग करण्याचाही सल्ला देता येऊ शकतो. अनेकदा त्यातूनही आजाराचे कारण शोधता येते.
काय आहे हार्ट अटॅक व कार्डियक अरेस्ट?
डॉक्टर हृदयविकाराच्या धक्क्याच्या इशारा व लक्षणांविषयी जनजागृती वाढवण्यावरही जोर देतात. तसेच अशा स्थितींचा निपटारा कसा करावा असेही ते सांगतात. वास्तविक, ब्लड सर्क्युलेशन थांबल्याने किंवा संथ झाल्याने हार्ट अटॅक येतो. म्हणजे हार्ट अटॅक ही सर्क्युलेशनची एक समस्या आहे. दुसरीकडे, अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या (एएचए) माहितीनुसार, कार्डियक अरेस्टच्या 10 पैकी 9 जणांचा मृत्यू अवघ्या काही मिनिटांतच होतो.
हार्ट अटॅकनंतर येऊ शकतो कार्डियक अरेस्ट
एम्सच्या कार्डियोलॉजीचे अन्य एक प्रोफेसर डॉक्टर अंबुज रॉय यांच्या माहितीनुसार, हृदयविकाराचा धक्का आल्यानंतर अचानक कार्डियक अरेस्ट येऊ शकतो. ते म्हणाले, 'जोपर्यंत एखादी आरोग्य मदत मिळत नाही तोपर्यंत सीपीआर (कार्डियो-पल्मोनरी रिससिटेशन) अर्थात छातीवर दाब दिला तर रुग्ण बचावण्याची शक्यता जास्त असते.'
जी बी पंत रुग्णालयातील कार्डियोलॉजीचे प्रोफेसर डॉक्टर मोहित गुप्ता यांच्या माहितीनुसार, कोरोनरी आर्टरी ब्लॉकेजच्या 10 वर्षांपूर्वी झाल्यामुळे भारतीय यापूर्वीच मोठ्या जोखमीत वावरत आहेत. ते म्हणाले - 'उच्च रक्तदाब, डायबिटीज, लठ्ठपणा व धुम्रपान करणाऱ्या लोकांना कार्डियक अरेस्टचा मोठा धोका असतो. अशा लोकांची नियमित निगराणी केल्यास हार्टसंबंधी आजारांपासून स्वतःला दूर ठेवता येते.'
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.