आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउष्णतेच्या लाटेचा कहर उत्तर भारतासह उत्तराखंडमध्ये जाणवू लागला आहे. या डोंगराळ भागात पूर्वी वणवा मेअखेरपर्यंत असायचा. परंतु यंदा उष्णतेची लाट, दुष्काळ जून महिन्यातही पेटलेला वणवा दिसून येतो. आणखी काही दिवस तरी वणव्यापासून सुटका नसेल, असे हवामान विभागाचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी एप्रिलच्या तुलनेत यंदा एप्रिलमध्ये वणव्याचे प्रमाण ३० टक्के जास्त आहे. हवामान केंद्राचे संचालक बिक्रम सिंह म्हणाले, मार्चमध्ये ९१ टक्के तर एप्रिलमध्ये ९६ टक्के कमी पाऊस झाला. जवळपास सर्व उत्तराखंडमध्ये दुष्काळासारखी परिस्थिती आहे. म्हणूनच वाढत्या तापमानामुळे वणव्याने विक्राळ रूप धारण केले आहे. आतापर्यंत ४८४७ हेक्टर वनक्षेत्र खाक झाले. पाऊस लवकर पडला नाही तर परिस्थिती आणखी वाईट होऊ शकते. सर्वाधिक वाईट स्थिती टिहरी चमोली जिल्ह्यातील नंद प्रयाग रेंजमध्ये आहे. चारही बाजूंनी आग पसरल्याने वयस्कर तसेच लहान मुलांना श्वास तसेच अॅलर्जीचा विकार जाणवू लागला आहे. दून वैद्यकीय महाविद्यालयातील सीनियर फिजिशियन डॉ. प्रवीण पवार म्हणाले, या काळात चेहऱ्याला झाकले पाहिजे. डोळ्यांना वारंवार थंड पाण्याने धुवावे. उत्तराखंड अंतराळ केंद्राचे संचालक प्रो. एम.पी.एस बिष्ट यांच्या म्हणण्यानुसार काही दिवसांनंतर वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे वणवा आणखी पेटू शकतो.
वणव्यामुळे अनेक संकटांना निमंत्रण
वनक्षेत्रातील वणव्यामुळे वनसंपदेची हानी तर होत आहेच, त्याबरोबर वन्यजीवांवरही संकट आहे. भूवैज्ञानिक डॉ. जे.एस. रावत म्हणाले, आगीमुळे साधनसंपत्तीची हानी होत आहे. यातून वनसंपत्ती आणि जैवविविधतेवरील संकट आले आहे. वणव्यामुळे वन क्षेत्र आणि परिसरातील लोकांमध्ये चिंता आहे. वन क्षेत्रातील साधन संपत्तीवर उदरनिर्वाह करणाऱ्यांच्याही अडचणी आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.