आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Heavy Firing After Blast In Down Town Of Srinagar, Bhaskar Reporter Also Trapped On The Spot; News And Live Updates

कलम 370:जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या निर्णयास आज दोन वर्षे पूर्ण; श्रीनगरमधील डाऊन टाऊन भागात मोठा दहशतवादी हल्ला

श्रीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोनवरुन त्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

केंद्र सरकारने 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 हटवले होते. त्यानंतर अनेक दिवस या राज्यात इंटरनेट सेवा बंद होती. या घटनेला आज दोन वर्ष पूर्ण होत आहे. या निर्णयामुळे काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांत 85% घट झाल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. परंतु, आज श्रीनगरमधील डाऊन टाऊन भागात दहशतवाद्यांकडून मोठा हल्ला करण्यात आला आहे. यावेळी भास्करचे पत्रकार वैभव पलनीटकर घटनास्थळी उपस्थित होते. दरम्यान, फोनवरुन त्यांनी या घटनेबाबत माहिती दिली आहे.

डोळ्यासमोर दहशतवादी हल्ल्या
वैभव म्हणाले की, 'मी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्याला 2 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रिपोर्टींग करत होतो. मी माझ्या टीमसह दुपारी 12 च्या सुमारास जामा मशीद परिसरात आलो. मी मशिदी समोरच्या रस्त्यावर एका पोलीस अधिकाऱ्याशी बोलत असताना जामा मशिदीच्या गेटसमोर ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यानंतर लगेचच जोरदार गोळीबार सुरू झाला. स्थानिक लोकांनी मला मदत केली. दरम्यान, मी एका दुकानात पोहोचलो जिथे स्थानिक लोकांनी मला घाबरू नका असे सांगितले. यानंतर मी दुसरा रस्ता सोडून पुन्हा जामा मशीद गाठली. या काळात बरीच माध्यमे तिथे आली होती.

फंडिंग रोखण्यासाठी संस्था, संघटनांवर कारवाई
केंद्राने काश्मीरमध्ये सर्वाधिक प्रभावी सामाजिक व धार्मिक संघटना जमात-ए-इस्लामीवर जोरदार कारवाई सुरू केली. दहशतीसाठी निधी देण्याच्या आरोपाखाली शेकडो सदस्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. काही अजूनही तुरुंगात आहेत. जमात-ए-इस्लामीच्या किमान 29 कार्यकर्त्यांना 2019 मध्ये आणि आठ जणांना 2020 मध्ये ताब्यात घेण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...