आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हवामानाची स्थिती:उत्तर भारतात दोन दिवस राहील दाट धुके, थंडीची लाट येण्याचाही अंदाज

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
बद्रीनाथमध्ये बर्फाची चादर, शेषनेत्र सरोवर गोठले... - Divya Marathi
बद्रीनाथमध्ये बर्फाची चादर, शेषनेत्र सरोवर गोठले...
  • हवामान खात्याचा इशारा, आवश्यक नसल्यास पुढील 3 दिवस प्रवास टाळा

हवामान खात्याने मंगळवारी २७ जानेवारीपर्यंत उत्तर भारत तसेच मध्य, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य राज्यांतील सर्व भागात दाट धुके आणि शीतलहरीचा अंदाज व्यक्त केला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांसाठी इशारा दिला आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की, गजर नसल्यास पुढील काही दिवस प्रवासाची योजना टाळा. तसेच उत्तर राजस्थान, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये दाट धुक्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील काही भागात २५-२६ जानेवारीला थंडी राहण्याची शक्यता आहे. गुजरातच्या सौराष्ट्र व कच्छ, उत्तर राजस्थान, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीत २६ जानेवारीला शीतलहर येऊ शकते. हीच स्थिती २७ जानेवारीलाही राहण्याचा अंदाज आहे. हवामान खात्यानुसार पुढील ४ ते ५ दिवसांत पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थान, आसाम, मेघालय, मणिपूर, त्रिपुरात दाट धुके राहील. काश्मीरमधील बहुतांश भागात मोठ्या हिमवर्षावामुळे लोक त्रस्त आहेत. सततच्या हिमवृष्टीने पुन्हा एकदा जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद करण्यात आला आहे. काश्मीरमध्ये हिमवृष्टीसह बर्फाळ वादळाची भीती कायम आहे. सध्या काही दिवस उत्तर प्रदेशातील मध्य व पूर्व भाग, बिहार व पश्चिम बंगालसह ईशान्येत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँडमध्ये दाट धुके राहील.

दिल्लीत हवेची गुणवत्ता खूप वाईट श्रेणीत
दिल्ली आणि एनसीआरच्या लोकांना वाईट हवेपासून दिलासा मिळताना दिसत नाही. राजधानीचा वायू गुणवत्ता इंडेक्स सोमवारी ३३९ होता, जो खूप वाईट श्रेणीत येतो. एअर क्वालिटी इंडेक्स ०-५० असल्यास चांगले, ५१-१०० दरम्यान समाधानकारक, १०१- २०० मध्यम, २०१-३०० खराब, ३०१-४०० खूप खराब तर ४०१-५०० गंभीर मानला जातो.

हवामान बदलामुळे प्रभावित टॉप टेन देशांत भारत
हवामान बदलामुळे प्रभावित टॉप टेन देशांच्या यादीत भारताचाही समावेश आहे. सोमवारी पर्यावरणीय थिंक टँक जर्मनवॉचने ग्लोबल क्लायमेट रिस्क इंडेक्स २०२१ जाहीर केला. अहवालानुसार विकासशील देशांतील लोक वादळ, पूर, उष्णतेची लाट यासारख्या हवामाना बदलाशी संबंधित समस्यांनी जास्त प्रभावित होतील. सन २०१९ मध्येही भारत या यादीत सातव्या क्रमांकावर होता. गेल्या २० वर्षांत जागतिक पातळीवर ४.८० लाख अशी संकटे आली, ज्यांचा थेट संबंध हवामान बदलाशी संबंध आहे.