आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशात मुसळधार पावसाचा इशारा:यूपी, राजस्थानसह 8 राज्यांत 2-3 दिवस जोरदार पाऊस पडणार, महाराष्ट्रात पूरसदृष्य परिस्थिती; अनेक ठिकाणी पूर आणि दरडी कोसळण्याचा धोका

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

देशात मान्सून अधूनमधून सक्रिय होत आहे. या पावसामुळे देशातील अनेक शहरांत कहर निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे, अनेक लोक या पावसाच्या प्रतिक्षेत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पाणीच पाणी साचले असून बस, ट्रेन आणि विमानाच्या उड्डाणावर याचा मोठा परिणाम झाला आहे.

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे दरड कोसळल्याने यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, 5 घरेही कोसळली आहेत. बचाव कार्य वेगाने सुरु आहे.

मुसळधार पावसामुळे मुंबईतील विरार तलाव ओसंडून वाहत आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईतील विरार तलाव ओसंडून वाहत आहे.

या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, देशात रविवारी आणि सोमवारी अनेक भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्तानमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे, सोमवारी जम्मू-काश्मीर, लडाख आणि पंजाब राज्यातदेखील हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात पूरसदृष्य परिस्थिती
मुंबईत गुरुवार रात्रीपासून अधूनमधून पाऊस सुरु आहे. यामुळे चेंबूर, कांदिवली आणि बोरिवली पूर्व येथे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबईत रविवार सकाळपासून अनेक भागात पाऊस सुरु आहे. आज येथे मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विभागाने वर्तवली आहे.

बातम्या आणखी आहेत...