आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Mansoon Updates: In Maharastra State Mansoon Are Come In 10 June 2021; News And Live Updates

मान्सून ट्रॅकर:केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हजेरी लावत मान्सून कर्नाटकात दाखल; महाराष्ट्रात 10 जूनला पोहचणार

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मान्सून घोषित करण्याचे हे मानक आहेत

मान्सूनचे काही दिवसापूर्वी केरळ राज्यांत आगमन झाले होते. आता केरळ आणि लक्षद्वीपमध्ये हजेरी लावत मान्सून कर्नाटक राज्यात दाखल झाले आहे. त्यामुळे दक्षिण आणि उत्तर कर्नाटकसह तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातही पाऊस पडत आहे. गेल्या 24 तासांत या राज्यांमध्ये पावसाने अधूनमधून हजेरी लावली आहे. हवामान खात्याने येत्या 12 तासांत या राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मान्सून 10 जून रोजी महाराष्ट्र राज्यात दाखल होणार आहे. त्यासोबतच मध्यप्रदेश 20 जून तर राजस्थानमध्ये 25 जूनला पोहचणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशात आलेल्या तौक्ते आणि यास चक्रीवादळांमुळे नौतापा आणि 'लू'चा प्रभाव अनेक राज्यांत पाहायला मिळाला नाही. दिल्लीत हा पहिलाच उन्हाळा आहे, ज्यामध्ये उष्णतेच्या लाटा पाहायला मिळाले नसल्याचे आयएमडीने सांगितले. त्यामुळे दिल्लीत येत्या काही दिवसांत पाऊस सुरु होऊ शकतो.

मान्सून घोषित करण्याचे हे मानक आहेत

  • केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमधील 14 हवामान केंद्रांपैकी 60% मध्ये 10 मे नंतर सलग दोन दिवस 2.5 मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला पाहिजे.
  • पश्चिम दिशेच्या सपाटीपासून साडेचार किमी उंचीपर्यंत वेगाने वारे वाहू लागतील, वारा वेग जमिनीच्या पृष्ठभागाच्या जवळपास 30 ते 35 किमी पर्यंत असेल.
  • ढगांची जाडी इतकी असावी की, जमिनीवरून आकाशात परत येणारे रेडिएशन प्रति चौरस मीटरपेक्षा 200 वॅटपेक्षा कमी असेल.
बातम्या आणखी आहेत...