आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवामान:गुजरातच्या 4 जिल्ह्यांत मुसळधार पावसाने पूर, यूपीत 15 मृत्युमुखी; खाडीत आणखी एक मान्सून सिस्टिम

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मुसळधार पाऊस सुरू आहे. गुरुवारी दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंडसह १० हून जास्त राज्यांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक भागात पूरस्थिती आहे. गुजरातमध्ये घरे-दुकाने, रेल्वे मार्ग पाण्यात बुडाले आहेत. गुजरातच्या चार शहरांत राजकोट, केसोद, पाेरबंदर आणि वलसाडमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे.गुजरातमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक २०३ मिमी पाऊस राजकोटमध्ये झाले. उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे राजधानी लखनऊसह अनेक जिल्ह्यांत पूरस्थिती दिसून येत आहे. लखनऊच्या रस्त्यांवर चार फुटापर्यंत पाणी साचले आहे. जोरदार पावसामुळे घडलेल्या विविध घटनांत संपूर्ण उत्तर प्रदेशात १५ जणांचा मृत्यू झाला. हवामान विभागानुसार उत्तर प्रदेशातील २० पेक्षा जास्त जिल्ह्यांत पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दुसरीकडे उत्तराखंड व हिमाचल प्रदेशात दरड कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. त्यामुळे महामार्ग बंद झाला आहे.

२४ तासांत नवी सिस्टिम प्रभावी होणार
स्कायमेटनुसार बंगालच्या उपसागरात आणखी एक मान्सून सिस्टिम तयार होत आहे. शुक्रवारी ईशान्येत बंगालच्या खाडीपर्यंत ती पोहोचेल. चोवीस तासांत ते जास्त सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...