आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चेन्नईला मुसळधार पावसाने झोडपले:मोडला 30 वर्षांचा विक्रम, अनेक जिल्ह्यांतील शाळा-कॉलेज बंद

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. चेन्नईत मंगळवारी 8.4 सेमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या 30 वर्षाचा विक्रम मोडला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, रस्तेही जलमय झाले. पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून जनजीवन विस्कळीत झाले असून कामेही ठप्प झाली आहेत.

शाळा, महाविद्यालये बंद
मुसळधार पावसामुळे चेन्नई आणि तंजावर, तिरुवरूर, नागापट्टिनम, कांचीपुरम, तिरुवल्लूर आणि चेंगलपेट या इतर सहा जिल्ह्यांमध्येही शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ग्रेटर चेन्नई कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांनी गणेशपुरमसारख्या भुयारी मार्गांसह अनेक भागांची पाहणी केली. पूरग्रस्त भागात पूरनिरीक्षण कॅमेरेही बसवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांची बैठक होणार
चेन्नई मेट्रोरेल फेज-2 प्रकल्पामुळे रस्त्यांच्या अनेक भागात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आज राज्य सचिवालयात एका उच्चस्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. भारतीय हवामान विभाग (IMD) ने यापूर्वी तामिळनाडूमध्ये 5 नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा दिला होता. तर 4 नोव्हेंबरपर्यंत एलो अलर्ट दिला होता. तिरुप्पत्तूर आणि वेल्लोर सारखे काही जिल्हे आज ऑरेंज अलर्टवर आहेत.

पाच राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्यानुसार, 1 नोव्हेंबर 2022 रोजी तामिळनाडू, केरळसह 5 राज्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. राज्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान खात्याने आज 5 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...