आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Height Of Hindus 1, Decrease Of 1.27 Cm Among Muslims, Claims Based On National Health Survey

दिव्य मराठी विशेष:हिंदूंच्या उंचीत 1, मुस्लिमांत 1.27 सेंमीने घट, राष्ट्रीय आरोग्य पाहणीच्या आधारे दावा

राजकाेट / इम्रान हाेथी15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रो. के.के. चौधरी - Divya Marathi
प्रो. के.के. चौधरी

जगभरातील लाेकांची उंची वाढू लागली आहे, परंतु भारतात उंचीत सरासरी १.१० सेंटिमीटरपर्यंत घट दिसून येत आहे. सर्वाधिक उंची असलेल्या जैन-शीख समुदायात घट झाल्याचे दिसून येते. हिंदूंमध्ये सरासरी १६४.३९ हून १६३.३९ तर मुस्लिमांत सरासरी १६४.४६ हून ६३.१३ सेंमी झाली आहे. म्हणूनच हिंदू व मुस्लिमांची उंची अनुक्रमे १ व १.२७ सेंमीने घटली आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे प्राे. के. के. चाैधरी यांनी राष्ट्रीय कुटुंब व आराेग्य पाहणीच्या विश्लेषणानंतर हा निष्कर्ष काढला आहे. १९९८ ते २०१५ या कालावधीत तीन वेळा पाहणी करण्यात आली. या पाहणीवरून भारतीयांच्या उंचीत सरासरी १.१० सेंमी घट झाली तर महिलांच्या उंचीसंबंधी तिसऱ्या पाहणीत वाढल्याचे दिसून आले. चाैथ्या पाहणीत घट झाली. गरीब वर्गातील महिलांच्या उंचीत सातत्याने घट हाेत आहे.समृद्ध वर्गातील महिलांच्या उंचीत वाढ नाेंदवण्यात आली आहे. आदिवासी महिलांची उंची सर्वात कमी झाली.

गुजरातच्या पुरुषांची उंची ०.९५ सेंमीने कमी झाली. ईशान्येतील राज्यांत राहणाऱ्या नागरिकांची उंची वाढत आहे. १५ ते २५ या वयाेगटात मेघालयात १५७.३७ सेंमीसह १.५७ सेंमीची वाढ दिसून आली. मणिपूर, नागालँड, मिझाेराममध्येदेखील उंचीत वाढ झाली आहे. जैन समुदायात सरासरी उंची १६९.६१ नाेंदली गेली. त्यात घट हाेऊन १६५.३१ झाली आहे. शीख समुदायात सरासरी उंची १६९.३९ हाेती. आता त्यात १.९४ सेंमीने घट हाेऊन ती १६७.४५ सेंमी अशी नाेंदण्यात आली.

तरुणावस्थेत पाेषणयुक्त आहार महत्त्वाचा
प्राे. चाैधरी म्हणाले, भारतातील लाेकांच्या उंचीत घट हाेणे हे चिंताजनक आहे. तसे पाहिल्यास उंची जीनच्या आधारे निश्चित हाेते. परंतु निवास, आराेग्यसेवा, पेयजल, राहणीमान, भाेजन आणि पाेषण इत्यादीचीदेखील महत्त्वाची भूमिका असते. बाल्यावस्थेतील कुपाेषण हाेणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. तरुणपणात पाेषणयुक्त आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तरुण अवस्थेत शरीराचे ५० टक्के वजन वाढते आणि २० टक्के उंची वाढत असते.

बातम्या आणखी आहेत...