आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर क्रॅश होत असतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. क्रॅश होण्याच्या अवघ्या काही सेकंदांपूर्वी काय घडले हे या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. नीलगिरीच्या जंगलांत फिरणाऱ्या एका टूरिस्टने हा व्हिडिओ रेकॉर्ड केल्याचा दावा केला. त्यानुसार, हेलिकॉप्टर धुक्यांमध्ये आणि अगदी कमी उंचीवर उडत होते असे दिसते. अवघ्या काही सेकंदात हेलिकॉप्टर जमीनीवर आदळले. या हेलिकॉप्टरचे ब्लॅक बॉक्स सुद्धा सापडले आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी तामिळनाडूच्या जंगलात घडलेल्या या घटनेची माहिती गुरुवारी संसदेत दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, कुन्नूर परिसरात रावत यांच्या हेलिकॉप्टरचा बुधवारी दुपारी 12.08 वाजेच्या सुमारास एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. स्थानिक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी हेलिकॉप्टर जळून कोळसा झाले होते. यानंतर बचाव पथक पोहोचले आणि काहींना बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हेलिकॉप्टरमध्ये 14 जण होते. त्यातील 13 जणांचा मृत्यू झाला. तर हल्ल्यात बचावलेले एकमेव ग्रुप कॅप्टन वरुण सिंह वेलिंगटन रुग्णालयात लाइफ सपोर्टवर आहेत.
झाडांवर मग जमीनीवर कोसळले हेलिकॉप्टर
या घटनेतील काही प्रत्यक्षदर्शी समोर आले आहेत. त्यांनी सांगितले, की हेलिकॉप्टर सुरुवातीला झाडांवर आदळले. यानंतर जमीनीवर क्रॅश लँड झाले. अपघात होताच हेलिकॉप्टरला आग लागली. काहींच्या सांगितल्याप्रमाणे, हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या लोकांना सुद्धा आग लागली होती.
मोठा आवाज आल्याने गर्दी
एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, की तो आपल्या घरात होता. त्याचवेळी एक जोरदार आवाज ऐकू आला. बाहेर येऊन पाहिले तेव्हा हेलिकॉप्टर क्रॅश झाले होते. एकानंतर एक झाडांवर आदळल्यानंतर त्यात आग लागली होती. त्याने काहींनी हेलिकॉप्टरमधून पेटलेल्या अवस्थेतच बाहेर पडताना पाहिले. त्यानेच इतरांना घटनास्थळी बोलावण्याचा प्रयत्न केला. यानंतर बचाव पथकाला माहिती देण्यात आली.
ब्लॅक बॉक्स सापडला, म्हणजे नेमके काय?
ब्लॅक बॉक्स स्टील किंवा टायटेनियमने बनलेले एक इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डिंग डिव्हाइस असते. विमान किंवा हेलिकॉप्टर दुर्घटनेच्या वेळी शेवटचे रेकॉर्डिंग त्यात नमूद केले जाते. नाव ब्लॅक बॉक्स असले तरीही ते भगव्या रंगाचे असते. यालाच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) किंवा कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एका बूटाच्या बॉक्सच्या आकाराचे असते.
FDR मध्ये केवळ आवाजच नाही तर हवेचा वेग, फ्लाइटची उंची, वर जाण्याची स्पीड आणि इंधन यासोबतच 80 प्रकारच्या नोंदी केल्या जातात. यात 25 तासांचे रेकॉर्डिंग स्टोरेज असते. शेवटच्या वेळी पायलट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स यांची काय बातचित झाली. स्विच आणि इंजिनचा आवाज इत्यादी यात नमूद केला जातो. क्रॅशिंगचा तपास करताना ब्लॅक बॉक्स सर्वात महत्वाचे ठरते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.