आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Rahul Gandhi Promise For Helicopter Ride; Fulfilled By Calling Rajasthan | Rahul Gandhi

राहुल गांधींनी शब्द पाळला:उज्जैनमध्ये दिलेलं वचन राजस्थानमध्ये केलं पूर्ण; 3 मुलींसोबत केली हेलिकॉप्टर राईड

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसच्या माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. राहुल यांनी उज्जैनमधील तीन मुलींना हेलिकॉप्टर राईडचा शब्द दिला होता आणि त्यांनी तो पाळला आहे.

काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' बुंदी जिल्ह्यात दाखल झाली. गुरुवारी कोटा येथील यात्रा संपल्यानंतर राहुल थेट बुंदीतील गुडली येथे बांधलेल्या हेलिपॅडवर पोहोचले. तिथे उज्जैनच्या तीन विद्यार्थींनी राहुल यांची वाट पाहत बसल्या होत्या. त्या राहुल यांच्यासोबत हेलिकॉप्टर राईडसाठी आल्या होत्या. 29 नोव्हेंबर रोजी उज्जैनमध्ये यात्रेत राहुल 11 मध्ये शिकत असेलल्या विद्यार्थिनी शीतल, लहनैना आणि 10 वीची विद्यार्थिनी गिरीजा यांच्याशी भेटले होते. त्यांच्या स्वप्नाबद्दल राहुल यांनी मुलींशी चर्चा केली. तसेच अभ्यासाव्यतीरिक्त काय स्वप्ने आहेत, असा सवाल त्यांनी मुलींना केल्यानंतर विमानाने प्रवास करण्याचे स्वप्न असल्याचे मुलींनी सांगितले. तेव्हा हलिकॉप्टर राईड करुया, असा शब्द राहुल यांनी मुलींना दिला होता.

10 दिवसात दिलेले वचन पाळत राहुल यांनी तीन विद्यार्थिनींसोबत 20 मिनिटांची हेलिकॉप्टर राईड केली. तिन्ही विद्यार्थिनी हेलिकॉप्टरमधून खाली उतरल्यावर राहुलने त्यांना चॉकलेटही दिली. यासोबतच राहुल आणि हेलिकॉप्टर पायलट यांनी विद्यार्थिनींना 10 मिनिटे हेलिकॉप्टरची तांत्रिक माहिती दिली. यानंतर राहुल गांधी थेट सोनिया गांधींना भेटण्यासाठी सवाई माधोपूरला रवाना झाले.

'हा क्षण आमच्यासाठी अकल्पनीय होता'

तीन मुलींनी दिव्य मराठीशी संवाद साधला. हे आमच्यासाठी स्वप्नपूर्तीसारखे आहे. पहिल्यांदा हेलिकॉप्टरमध्ये बसलो आणि तेही राहुल गांधींसोबत. हा क्षण आमच्यासाठी अकल्पनीय होता आणि अविस्मरणीय राहील, असे त्या म्हणाल्या.

तुमच्या आवडीचे करिअर निवडा

मुलांनी जे काही करावे ते मनापासून करावे, त्यांना जे आवडते ते मनापासून करून करिअर घडवावे, असे ते म्हणाले. विद्यार्थिनींनी सांगितले की, राहुलने आम्हाला कुटुंब किंवा समाजाच्या दबावाखाली करिअर निवडू नका, तुमच्या आवडीचे करिअर निवडा. विमानप्रवासानंतर राहुलने विद्यार्थिनींना हेलिकॉप्टरचा वेग किती आहे, किती अंतर कापले आहे, अशी महत्त्वाची माहिती दिली.

हेलिकॉप्टरबद्दल मुलींमध्ये प्रचंड उत्साह होता. तसेच हेलिकॉप्टरबाबत त्यांनी पायलटला अनेक प्रश्न विचारले.
हेलिकॉप्टरबद्दल मुलींमध्ये प्रचंड उत्साह होता. तसेच हेलिकॉप्टरबाबत त्यांनी पायलटला अनेक प्रश्न विचारले.

12 वर्षाच्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले

राहुल गांधी यांनी एन्टनी फेलिक्स या मुलाला स्पोर्ट्स शूज देण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार राहुल गांधी यांनी त्या मुलाला स्पोर्ट्स शूज पाठवले होते. त्याचं झालं असं की राहुल गांधी तामिळनाडू दौऱ्यावर होते. त्यावेळी कन्याकुमारीमध्ये त्यांची फेलिक्ससोबत भेट झाली होती. फेलिक्स त्यावेळी पायात काहीही न घालता मुख्यमंत्री के. कामराज यांचं पोस्टर घेऊन उभा होता. त्यावेळी राहुल गांधी यांची नजर त्याच्यावर पडली. त्यावेळी राहुल यांनी आपला ताफा रस्त्याच्या कडेला एका चहाच्या स्टॉलवर चहा पिण्यासाठी थांबवला होता.

त्यावेळी राहुल यांनी फेलिक्सला जवळ घेऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवत चहाच्या स्टॉलकडे गेले. त्यावेळी फेलिक्ससोबत त्यांनी गप्पागोष्टीही केल्या. त्यावेळी राहुल यांनी त्याच्या आवडीनिवडी विचारल्या. त्यावेळी आपल्याला धावायला आवडत असल्याचं फेलिक्सने सांगितलं होतं. मग तू पायात काहीही न घालताच धावतो का? असा प्रश्न राहुल यांनी फेलिक्सला विचारला होता.

त्याचबरोबर तुला लवकरच स्पोर्ट्स शूज पाठवून देतो असा शब्दही राहुल यांनी फेलिक्सला दिला होता. तसंच ट्रेनिंगसाठी एखाद्या अकॅडमीत दाखल होण्यासाठी मदत करतो, असं आश्वासनही राहुल यांनी फेलिक्सला दिलं. दरम्यान, राहुल यांनी पाठवलेले स्पोर्ट्स शूज पाहून फेलिक्सच्या गालावर हसू उमटल्याचं पाहायला मिळालं.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू झालेली काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा राजस्थानमध्ये पोहचली आहे. याआधी या भारत जोडो यात्रेला तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राजस्थानमध्ये यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...