आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रथमच हेलिकॉप्टर सेवा:हेलिकॉप्टर सेवेने एकादिवसात अमरनाथ यात्रा

श्रीनगर15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाबा बर्फानीच्या भाविकांची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण झाली आहे. अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांना श्रीनगरहून पंचतरणीसाठी प्रथमच हेलिकॉप्टर सेवा उपलब्ध झाली आहे. यामुळे यात्रेकरू एका दिवसात पवित्र गुहेतील बाबा बर्फानीचे दर्शन घेऊन श्रीनगरला परततील. याआधी केवळ बालटाल आणि नुनवनहून(पहलगाम) पंचतरणीपर्यंतच सेवा उपलब्ध होती. ही आधीसारखीच सुरू राहील. मात्र, पहलगामहून जाणाऱ्यांना परत येण्यासाठी दोन दिवस लागत होते. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी गुरुवारी ऑनलाइन हेलिकॉप्टर बुकिंग पोर्टलचे उद्‌घाटन केले. पंचतरणीहून पवित्र गुहेचे अंतर केवळ ५ किमी राहते. भाविक श्री अमरनाथ देवस्थान मंडळाची वेबसाइट www.shriamarnathjishrine.com वर बुकिंग करू शकतात.

बातम्या आणखी आहेत...