आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Help Is Possible By Setting Up Oxygen Tanks In Hospitals; Vardhman Stil Jain, News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सप्लेनर:रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन टँक उभारल्यास मदत शक्य

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात ऑक्सिजनचा तुटवडा कधीपर्यंत दूर होईल?

देशात ऑक्सिजनचा तुटवडा आहे. भास्करचे प्रमोद तिवारी यांनी वर्धमान स्टीलचे सचिन जैन, बीएचईएलचे अनिल वार्शने, ऑल इंडिया इंडस्ट्री गॅसेस मॅन्युफॅक्चरिंग असो. चे सुनील गुप्ता यांच्याकडून अडचणी दूर कशा होतील, उपाय जाणून घेऊया..

देशात ऑक्सिजनचा तुटवडा कधीपर्यंत दूर होईल?
ही समस्या एक ते दोन आठवड्यात दूर होईल. टँकर व रेल्वेने पुरवठा सुरू झाला. त्यामुळे मागणी व पुरवठा योग्य पद्धतीने चालू लागेल. आैद्योगिक प्रकल्प जवळ असलेल्या शहरांतील समस्या जवळपास दूर झाली आहे.

शहरांजवळील प्रकल्प असूनही तुटवडा आहेच ना?
तेथे ऑक्सिजनचा नव्हे सिलेंडरचा तुटवडा आहे. वर्धमान स्टिल प्लांटचे व्यवस्थापकीय संचालक सचिन जैन म्हणाले, लुधियानाच्या परिसरात ६० टक्के ऑक्सिजनचा पुरवठा होतोय. पुरवठा वाहिनीने होता. तरीही १५०० सिलेंडरची मदत घेत आहोत. प्रकल्प असलेल्या ठिकाणी तुटवडा नाही. लोकांंमध्ये घबराट आहे. गुजरातच्या एम्स ऑक्सिजनचे अनिश पटेल म्हणाले, डिमांड असल्याने तंगी आहे. सरकार निगराणी करत आहे. मदत मिळते.

रुग्णालयांत सहज कसे उपलब्ध होईल?
प्रत्येक रुग्णालयाकडे लिक्विड ऑक्सिजन टँक असला पाहिजे. त्यामुळे साठवणीत अडचण येत नाही. अशा ठिकाणी ऑक्सिजनला वायूरुपात आणण्याच्या प्रक्रियेवर भर द्यावा लागेल. जास्त गरज असलेल्या ठिकाणी पीएसए प्रकल्प सुरू करता येतील. यातून निश्चित प्रमाणात ऑक्सिजन मिळतो.

मेडिकल व आैद्योगिक ऑक्सिजनमध्ये फरक काय?
दोन्हीत काहीही फरक नाही. हे एकाच प्रकारच्या प्रकल्पात तयार होतात. एकाच प्रकारच्या टँक व सिलेंडरमध्ये साठवले जातात. मेडिकल ऑक्सिजनसाठी कंपनीला केवळ प्रत्येक बॅचची तपासणी, प्रमाणिकरण करून बाजारात पाठवावे लागते. उद्योगासाठी ९९.५ टक्के शुद्ध ऑक्सिजनची गरज असते. मेडिकल ऑक्सिजनसाठी ९३ टक्के हवे असते.

अतिरिक्त सिलिंडर का ठेवले जात नाहीत?
ऑक्सिजनमध्ये असे नाही. एक सिलिंडर १० हजारांचे असते. त्यात गॅस केवळ २५० रुपयांचा असतो. म्हणूनच गरजेसाठी ऑक्सिजन बनवला जातो.

बातम्या आणखी आहेत...