आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Help With Last Journey, 48 Funerals In A Month, Social Work For 6 Years; The Story Of Humanitarian Crisis In Jodhpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सकारात्मक बातमी:शेवटच्या प्रवासात मदत, एका महिन्यात 48 अंत्यसंस्कार, 6 वर्षांपासून समाजकार्य; संकटकाळातील मानवसेवेची जोधपूरमधील गोष्ट

जोधपूर (शिव वर्मा)4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पीपीई किट घालून तयार राहतात, रुग्णालयातही मदत

कोरोनामुळे आजघडीला रोज हजारो जण प्राण सोडत आहेत. स्मशानात रांगा लागल्या आहेत. मृतांच्या नशिबात सन्मानपूर्वक अंत्यसंस्काराचाही योग नाही. अनेक ठिकाणी नातेवाईक जबाबदारी टाळत आहेत किंवा त्यांना कोविडमुळे मरण पावलेल्यांचा अंत्यसंस्कार करणे शक्य होत नाही. राजस्थानच्या जोधपूरमधील मुकेश गोदावत हे अशा प्रसंगांत मदतदूत ठरले आहेत. गेल्या महिन्यात त्यांनी ४८ मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

मुकेश फक्त कोरोनाकाळातच ही सेवा करण्यासाठी पुढे सरसावलेत असे नाही. गेल्या सहा वर्षांपासून ते अंत्यसंस्कारासाठी मोफत सेवा पुरवत आहेत. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा त्यांनी ३० अंत्यसंस्कार केले होते. आता दुसरी लाट इतकी भयंकर आहे की, शनिवारी एकाच दिवशी त्यांना ११ जणांवर अंत्यसंस्कार करावे लागले. एक अंत्यसंस्कार करून घरी पोहोचतात, तोच त्यांना दुसरा फोन येतो. पण, मुकेश हताश झाले नाहीत. अजूनही ते सतत सेवा करत आहेत.

इलेक्ट्रिक डेकोरेशनचे काम करणारे मुकेश यांनी सहा वर्षांपूर्वी समाजसेवेच्या रूपाने हे काम सुरू केले. त्यांनी पाहिले की, स्मशानात गेल्यानंतर मृताच्या नातेवाइकांना सर्व रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येतात. सोबतच त्यांना सगळी व्यवस्था करण्यासाठी फिरावे लागते. त्यामुळे मुकेश यांनी या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्यांनी सतत ही सेवा सुरू ठेवली. नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधतात तेव्हा स्मशानात जात लाकडे गोळा करण्यापासून ते पूजा साहित्य आणण्यासाठीही ते मदत करतात. ते म्हणतात, या भयंकर विषाणूने परिस्थिती आणखी बिकट केली आहे. याप्रसंगी सर्वांनी शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. गेल्यावर्षी कोरोनाने बळी जाऊ लागले तेव्हा अनेक लोकांना प्रोटोकॉलची माहितीही नव्हती. त्या वेळी मुकेश यांनी ही सगळी माहिती मिळवली आणि कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत अंत्यसंस्कार करायला सुरुवात केली.

पीपीई किट घालून तयार राहतात, रुग्णालयातही मदत
मृताच्या नातेवाइकांना सर्व रीतिरिवाजाने अंत्यसंस्कार करण्यात अडचणी येतात. सोबतच त्यांना सगळी व्यवस्था करण्यासाठी फिरावे लागते. त्यामुळे मुकेश यांनी या लोकांना मदत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून त्यांनी सतत ही सेवा सुरू ठेवली. नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधतात तेव्हा स्मशानात जात लाकडे गोळा करण्यापासून ते पूजा साहित्य आणण्यासाठीही ते मदत करतात.

बातम्या आणखी आहेत...