आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेमा मालिनींच्या महारासचा VIDEO:राधेची समजूत काढायला आले कृष्ण, झोका देत नाराजी केली दूर

मथुरा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ अभिनेत्री तथा भाजप खासदार हेमा मालिनींनी मथुरेच्या जवाहर बागमध्ये महारास रचला. 74 वर्षांच्या हेमा मालिनी तब्बल 1 तास व्यासपीठावर राहिल्या. श्रीकृष्णासोबत महारास सादरीकरणादरम्यान या वयातही हेमा मालिनींचा फिटनेस बघायला मिळाला. कृष्णाच्या मुरलीच्या तालावर त्यांच्या भावमुद्रा अद्भुत होत्या.

बुधवारी सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजता महारास सुरु होताच संगीताचे सूर जवाहर बागमध्ये ऐकायला मिळाले. प्रत्येकाची नजर महारासवर खिळून होती. सादरीकरण जसे जसे पुढे गेले तसे तसे प्रेक्षक त्यात हरवून गेले.

जवाहर बागमधील हा महारास मंगळवारी होणार होता. यात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही येणार होते. पण पावसामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. यानंतर हा कार्यक्रम बुधवारी ठेवण्यात आला.

हेमा मालिनींच्या महारासचे काही खास फोटो...

मनिहारिन लीला मंचनानंतर झूला उत्सव लीलेचे मंचन करण्यात आले. श्रावणातील पावसामुळे झालेल्या हिरवळीत राधा राणी बागेत झोक्यावर बसलेली असते. कृष्ण तिला झोका देतो.
मनिहारिन लीला मंचनानंतर झूला उत्सव लीलेचे मंचन करण्यात आले. श्रावणातील पावसामुळे झालेल्या हिरवळीत राधा राणी बागेत झोक्यावर बसलेली असते. कृष्ण तिला झोका देतो.
या फोटोत राधा बनलेल्या हेमा मालिनी भगवान कृष्णासोबत भांडताना दिसतात. भगवान कृष्ण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्या त्यांच्यावर रागावलेल्या आहेत.
या फोटोत राधा बनलेल्या हेमा मालिनी भगवान कृष्णासोबत भांडताना दिसतात. भगवान कृष्ण त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, पण त्या त्यांच्यावर रागावलेल्या आहेत.
राधा पाणी भरायला गेल्यावर कृष्ण तिचा रस्ता अडवतो. हे सादरीकरणही प्रेक्षकांना खूप आवडले.
राधा पाणी भरायला गेल्यावर कृष्ण तिचा रस्ता अडवतो. हे सादरीकरणही प्रेक्षकांना खूप आवडले.
भगवान कृष्ण आपल्याला मिळावे यासाठी राधा कात्यायनी देवीची पूजा करत आहे. यावेळी मैत्रीणीही राधासोबत आहेत.
भगवान कृष्ण आपल्याला मिळावे यासाठी राधा कात्यायनी देवीची पूजा करत आहे. यावेळी मैत्रीणीही राधासोबत आहेत.
महारासदरम्यान राधा मैत्रीणींसोबत. कृष्णावर नाराज झाल्यानंतर मैत्रीणी समजावताना दिसतात.
महारासदरम्यान राधा मैत्रीणींसोबत. कृष्णावर नाराज झाल्यानंतर मैत्रीणी समजावताना दिसतात.
पाणी आणण्यासाठी जाणारी राधा आणि गोपिका अशा प्रकारे चालताना दिसल्या. नृत्य सादरीकरणादरम्यान हेमा मालिनींनी राधाचे पात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगवले.
पाणी आणण्यासाठी जाणारी राधा आणि गोपिका अशा प्रकारे चालताना दिसल्या. नृत्य सादरीकरणादरम्यान हेमा मालिनींनी राधाचे पात्र खूप चांगल्या पद्धतीने रंगवले.
द्वापार युगात भगवान कृष्णासोबत रास रचवण्याची प्रत्येक गोपीची इच्छा होती. अशात भगवान कृष्णाने राधा आणि गोपिकांसोबत शरद पौर्णिमेला रास रचला.
द्वापार युगात भगवान कृष्णासोबत रास रचवण्याची प्रत्येक गोपीची इच्छा होती. अशात भगवान कृष्णाने राधा आणि गोपिकांसोबत शरद पौर्णिमेला रास रचला.

या आयोजनाविषयीच्या काही खास गोष्टी...

हेमा मालिनींनी स्वतः तयार केली महारासची थीम

हेमा मालिनी यांनी या महारासची पूर्ण थीम स्वतः तयार केली होती. मथुरेतील हे त्यांचे पहिले सादरीकरण नाही. यापूर्वी त्यांनी 2015 आणि 2018 मध्ये छटीकरा, वृंदावन आणि व्हेटर्नरी विद्यापीठात नृत्य सादरीकरण केले होते. खासदारांचे प्रतिनिधी जनार्दन शर्मांनी सांगितले की, हेमा मालिनींनी महारासची तयारी स्वतः केली.

योगीही आले, पण आयोजनात सहभागी होऊ शकले नाही

मंगळवारी सायंकाळी उशीरा या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही मथुरेला आले. पण कार्यक्रम स्थगित झाल्याने ते बुधवारी श्रीश्री कृष्ण बलराम मंदिराचे उद्घाटन केल्यानंतर कार्यक्रम न पाहताच निघून गेले. हेमा मालिनी जवाहर बागेत आयोजित महारास कार्यक्रमात सहकारी कलाकारांसोबत होत्या.

ब्रज तीर्थ विकास परिषदेने केले होते आयोजन

ब्रज तीर्थ विकास परिषदेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राधा रास बिहारी रास नृत्य नाटीका ग्रुपच्या सहकारी कलाकारांनी हेमा मालिनींसोबत महारास केला. यादरम्यान रविंद्र जैन यांची गाणी गायली गेली. नृत्य दिग्दर्शन भूषण लाकंद्रींनी केले.

महारास पाहण्यासाठी दूरवरून लोक आले

हा महारास पाहण्यासाठी लोक दूरवरून मथुरेत आले होते. गर्दी इतकी जास्त होती की लोकांनी खाली बसूनच कार्यक्रम बघितला. कॅबिनेट मंत्री बेबी रानी मौर्य, ब्रज तीर्थ विकास परिषद उपाध्यक्ष शैलजा कांत मिश्रही कार्यक्रमात सहभागी झाले.

बातम्या आणखी आहेत...