आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

इंजेक्शन किमतीत वाढ:आयसीयूतील कोरोनाग्रस्तांना दिले जाणारे हेपॅरिन इंजेक्शन 50 टक्क्यांनी महागणार, दरवाढीस केंद्राची मंजुरी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वीलेखक: सुनील चौधरी
  • कॉपी लिंक
  • फुप्फुसातील रक्ताच्या गुठळ्यांवर होतो वापर
Advertisement
Advertisement

केंद्राने हेपॅरिन इंजेक्शनच्या किमतीत ५०% वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. आयसीयूमध्ये दाखल कोरोना रुग्णांना हे इंजेक्शन दिले जात आहे. फुप्फुसातील रक्ताच्या गुठळ्या दूर करण्यासाठी त्याचा वापर होतो. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अॅथॉरिटीने हेपॅरिनची किंमत ५०% वाढवण्याचा निर्णय घेतला.

एनपीपीएच्या अध्यक्ष शुभ्रा सिंह म्हणाल्या की, कोविड रुग्णांसाठी हे इंजेक्शन महत्त्वाचे आहे. परंतु २०१८ पासून त्याच्या कच्च्या मालाच्या किमतीत २०० टक्क्यांनी वाढ झाली. तरी त्याची किंमत वाढली नव्हती. सर गंगाराम हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर एम. बाली म्हणाले की, आयसीयूमध्ये दाखल रुग्णांना हेपरिन इंजेक्शन दिले जाते. आता केवळ पल्माेनरी एम्बोलिझम असलेल्या रुग्णांना दिले जाते.

कोरोना औषधाचा कधीही दावा केला नाही : पतंजली

डेहराडून | काेरोनावर आैषध शोधल्याच्या दाव्यानंतर बाबा रामदेव यांच्या पतंजलीने यू-टर्न घेतला आहे. उत्तराखंड आयुष विभागाच्या नोटिसीच्या उत्तरात पतंजलीचे सीईओ आचार्य बालकृष्ण म्हणाले, आम्ही कधीही कोरोनावर औषध शोधल्याचा दावा केला नव्हता. आम्ही राेगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचे औषध आणले होते.

Advertisement
0