आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरचा युनेस्को वारसा टॅग धोक्यात आला आहे. इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेजच्या(इनटॅक) सर्व्हेत आढळले की, गेल्या २ दशकात सुमारे ४२ ऐतिहासिक वास्तू नष्ट झाल्या आहेत. २००३ मध्ये श्रीनगरमध्ये एकूण ३४९ ऐतिहासिक ठिकाणे होती, २०२२ मध्ये ती घटून ३०७ राहिली. इनटॅकचे अध्यक्ष मुहंमद सलीम बेग म्हणाले, २ दशकांत १२% स्थळे नष्ट केले. ६% चे खिंडार झाले आहे. नुकताच स्मार्ट सिटीसाठी सर्व्हे केला होता. त्यात दिसले की, २००३ च्या यादीनुसार, ५१% वास्तू जीर्ण होत आहेत.
अनेक जुन्या हवेली व इमारतींचा मालकी हक्क त्यांच्याशी संबंधित कुटुंबांकडे आहे. त्यामुळे ते त्याचे पाडापाडी करून नवे घर बांधत आहेत. झेलम नदीकिनाऱ्यावर तयार जुन्या इमारतीचे मालक म्हणाले, माझ्या कुटुंबाला आधुनिक सुविधा हव्या होत्या, म्हणून मी जुने घर पाडत आहे. सरकारने आधी वारसा इमारतीच्या मालकांना मदत करण्याची योजना आखली होती. मात्र, मदत कधी आली नाही. यामुळे ते पाडून नवीन घर बांधले जात आहे. बेग म्हणाले, २०१० मध्ये ऐतिहासिक ठिकाणांच्या संरक्षणाशी संबंधित कायदा बनवला. मात्र, तो जमीनीला लागू झाला नाही. परिणामी, ऐतिहासिक इमारती पाडण्यात आल्या. या ठिकाणांवर प्रोजेक्ट सुरू करण्याआधी सरकारकडून ३०% निधी दिला जाताे. मात्र, जम्मू-काश्मीर प्रशासनाने केंद्राकडून एकाही ऐतिहासिक स्थळासाठी या निधीची मागणी केली नाही. २०२१ मध्ये युनेस्कोने शिल्प,लोककला श्रेणीअंतर्गत ४९ शहरांपैकी श्रीनगरची निवड केली. ऐतिहासिक स्थळ असे नष्ट झाल्यास श्रीनगर युनेस्कोच्या वारसा टॅग गमावू शकते,असे जाणकार म्हणाले.
१४ व्या शतकात तयार इमारतीही जीर्ण झाल्या वर्ल्ड मॉन्यूमेंट्स वॉचनुसार, श्रीनगर शहरात अनेक महाविद्यालये, रुग्णालय आणि न्यायालयांचे बांधकाम ब्रिटिश राजवटीत झाले होते. शहराच्या केंद्र भागातील महाराजगंज, बोहरी कदल, गाड कोच आणि महाराज बाजारसारख्या पारंपरिक बाजाराचे अस्तित्व संकटात सापडले आहे. अनेक इमारती तर १४ व्या शतकात तयार झाल्या असून त्या सध्या जीर्ण आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.