आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • ISI ISLAMIK Country | Hi tech Module Of 'IS' In The Country; Extreme Engineers, Management Professionals

एक्सक्लुझिव्ह:देशामध्ये ‘आयएस’चे हायटेक मॉड्यूल; अतिरेकी अभियंते, मॅनेजमेंट व्यावसायिक, 48 संशयित

अवधेश आकोदिया | जयपूर16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एनआयएने देशात इस्लामिक स्टेट (आयएस) च्या हायटेक मॉड्यूलचा खुलासा केला आहे. यंत्रणेच्या एका अधिकाऱ्याने दिव्य मराठीला सांगितले की, ६ राज्यांच्या १३ ठिकाणांहून ४८ लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना नूपुर शर्मा प्रकरणानंतर काहीतरी मोठे करण्याचे निर्देश मिळाल्याचा खुलासा झाला. यासाठी त्यांनी देशाच्या प्रमुख धार्मिक स्थळांवर आत्मघातकी हल्ल्याचा कट रचला. लष्करी ठिकाणे आणि राज्यांची पोलिस मुख्यालयेही निशाण्यावर होती. हे लोक तीन वर्षांपासून माध्यमांवर कट्टरता वाढवण्याचे अभियान व तरुणांना आयएसमध्ये भरती करण्याचे काम करत होते. ते आयएसचे भारत केंद्रित ऑनलाइन मासिक ‘व्हाइस ऑफ हिंद’मध्ये कंटेंट पाठवणे व मासिकाचा स्थानिक भाषेत अनुवाद करण्याचे काम करत होते. एनआयएला या मॉड्यूलचे इनपुट आसिफ मुस्तीन, अख्तर हुसेन लश्कर, यासिर नवाब आणि मोहंमद जुबाच्या चौकशीतून मिळाले. हे चौघे आयएस अतिरेकी आहेत. त्यांना कर्नाटक व तामिळनाडू पोलिसांनी दक्षिण भारतातील शृंगेरी शारदा पीठ, कांची कामकोटी पीठ व रामचंद्रपुरा मठावरील हल्ल्याच्या कटात अटक केली होती. एनआयएने शनिवार व रविवारी मध्यप्रदेशातील भोपाळ, रायसेन, बिहारचे अररिया, गुजरातचे भरूच, सूरत, नवसारी, अहमदाबाद, युपीचे देवबंद, कर्नाटकचे भटकळ, तुमकुर व महाराष्ट्रातील कोल्हापूर व नांदेडमध्ये धाडी टाकल्या होत्या.

तुरुंगातील अतिरेकी जुफरी जौहर म्होरक्या

आयएसच्या या मॉड्यूलचा म्होरक्या तुरुंगात असलेला जुफरी जौहर दामुदी उर्फ अबू हाजिर अलबद्री आहे. त्याला एनआयएने ऑगस्ट २०२१ मध्ये पकडले होते. चौकशीत डिजिटल मॉड्यूलची माहिती मिळाली नव्हती. आता पकडल्या गेलेल्या संशयितांच्या चौकशीत या मॉड्यूलचा पर्दाफाश झाला.

बातम्या आणखी आहेत...