आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • International
  • Hi tech Olympics The Shirt Works Like A Walking Camera, The Drone Gets A 360 Degree View; News And Live Updates

दिव्य मराठी विशेष:हायटेक ऑलिम्पिक - शर्टचे वॉकिंग कॅमेऱ्याप्रमाणे काम, ड्रोनने 360 डिग्री व्ह्यू मिळेल, व्हीआरद्वारे पाहिल्यास स्टेडियममध्येच बसल्यासारखे वाटेल, रोबोटची खेळाडूंना मदत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुरक्षा आणि सुविधेसाठी जपानी कंपन्यांनी सादर केले अत्याधुनिक तंत्रज्ञान

२०१३ मध्ये ऑलिम्पिक समितीने २०२० च्या स्पर्धेसाठी टोकियोला यजमानपद दिले होते तेव्हाच हे इतिहासातील सर्वात इनोव्हेटिव्ह आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे ऑलिम्पिक असेल, असे जपानने ठरवले होते. कोरोनाने त्यात अडथळे आणले, पण जपानी कंपन्यांनी इनोव्हेशनमध्ये उणीव ठेवली नाही. स्पर्धक, प्रतिनिधी मंडळे आणि प्रेक्षकांच्या सुरक्षेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष उपकरणे लावण्यात आली आहेत. जगभरातील प्रेक्षकांना अद्भुत कव्हरेज दाखवण्याची तयारी आहे. हे कसे शक्य होणार ते जाणून घेऊ...

वर्तणुकीच्या पॅटर्नवर नजर
सुरक्षा एजन्सी सेकॉमने कर्मचाऱ्यांचे स्मार्टफोन त्यांच्या शर्टशी जोडले आहेत. त्यामुळे ते वॉकिंग कॅमेऱ्याप्रमाणे काम करतील. त्याद्वारे तयार व्हिडिओ नियंत्रण कक्षाला शेअर केले जातील. तेथे त्यांचे एआयद्वारे विश्लेषण होईल. ते व्यक्तीच्या वर्तणुकीचा पॅटर्न जाणून घेण्यास मदत करतील. त्यानुसार पुढील कारवाई होईल.

ड्रोन आधारित निगराणी
अलसोकने ड्रोन आधारित निगराणी तंत्रज्ञान लाँच केले आहे. ड्रोन ५० ते ७० मीटर उंचीवर ८ तास हवेत राहून ३ किमी क्षेत्राची निगराणी करतील. किलर ड्रोन आणण्याचेही काम सुरू आहे, लेजर बीमने सज्ज असलेले हे ड्रोन स्पर्धेदरम्यान अनधिकृत ड्रोन नष्ट करतील.

रिअल टाइम 8 के व्हिडिओ
ऑलिम्पिक स्पर्धेत विदेशी प्रेक्षकांना बंदी आहे. म्हणजे जगभरातील प्रेक्षक घरांत बसून खेळाचा आनंद लुटतील. त्यामुळे प्रेक्षक जपानच्या अत्याधुनिक प्रसारण तंत्रज्ञानावर अवलंबून राहतील. येथे ड्रोनची भूमिका महत्त्वाची असेल. ३६० अंश फुटेज कॅप्चर करण्याची क्षमता असलेले ड्रोन रिअल टाइम 8 के व्हिडिओ घेऊन 5 जी नेटवर्कद्वारे पाठवतील. त्यामुळे लाइव्ह स्पोर्टिंगची शैलीच बदलेल. प्रेक्षकांना त्याद्वारे बर्ड आयसह मल्टीपल व्ह्यू मिळतील. त्यासाठी डोकोमोने जगातील पहिली 8 के व्हर्च्युअल रिअॅलिटी लाइव्ह स्ट्रीमिंग आणि व्ह्यूइंग सिस्टीम बनवली आहे. प्रेक्षक व्हीआर हेडसेटद्वारे हे खेळ पाहतील तेव्हा आपण स्टेडियममध्येच उपस्थित आहोत, असे त्यांना वाटेल.

रोबोट, सेल्फ ड्रायव्हिंग कारही
फुजित्सू अांतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक फेडरेशनसोबत अशा लेझर तंत्रज्ञानावर काम करत आहे, ज्याचा वापर परीक्षक करू शकतील. इंटेलने 5 जीला व्यापक करण्यासाठी स्मार्ट सिटी बनवली आहे. वाहतूक व्यवस्थापन आणि ट्रॅकिंगमध्ये टोयोटा मदत करेल. विमानतळावर खेळाडूंच्या मदतीसाठी रोबोट तैनात असतील. सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि हायड्रोजन फ्युएल गाड्याही मदत करतील.

भाषेच्या समस्येवर मात करण्यासाठी इन्स्टंट लँग्वेज ट्रान्सलेटरचा वापर
हे एक मोठे जागतिक आयोजन आहे, त्यामुळे जगभरातून येणाऱ्या खेळाडूंच्या भाषाही वेगवेगळ्या असतील. भाषेमुळे त्यांना कुठलीही अडचण येऊ नये यासाठी स्टेट ऑफ द आर्ट ट्रान्सलेशन टेक्नॉलॉजी सादर केली आहे. ही रिअल टाइम ट्रान्सलेशन सुविधा स्मार्टफोन आणि इतर डिव्हाइसवर इन्स्टॉल केली जाऊ शकते. उदाहरणार्थ एखादा खेळाडू किंवा अधिकारी इंग्रजीत बोलला तर हे तंत्रज्ञान त्याचा जपानीत अनुवाद करेल. स्थानिक लोकांना ते सहजपणे समजू शकेल.

बातम्या आणखी आहेत...