आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • High Command Should Remove Leaders Who Have Been In The Party For 35 Years: Bishnoi

काँग्रेसमध्ये बंड:पक्षात खुर्च्या 35 वर्षांपासून उबवणाऱ्या नेत्यांना हायकमांडने हटवावे : बिश्नोई

नवी दिल्ली / जयपूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
सर्व अस्वस्थ, काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी
  • भजनलाल यांच्या पुत्राने साधला वरिष्ठ नेत्यांवर निशाणा

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भजनलाल यांचे पुत्र तथा आमदार कुलदीप बिश्नोई यांनी काँग्रेसमधील बंडावरून पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर गुरुवारी निशाणा साधला. या नेत्यांची काँग्रेसच्या महत्त्वाच्या निर्णयात मोठी भूमिका राहिली आहे. ज्योतिरादित्य सिंधिया व सचिन पायलट यांना मिळालेल्या वागणुकीमुळे कार्यकर्ते निराश झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसचे खूप नुकसान झाले आहे, असा आरोप बिश्नोई यांनी केला. पक्षश्रेष्ठींनी ३० ते ३५ वर्षांपासून खुर्चीवरील नेत्यांवर इतर जबाबदारी सोपवली पाहिजे. कारण हे नेते दीर्घकाळापासून निवडणूक लढवत नाहीत. राज्यात भाजपला टक्कर देण्यासाठी लोकांचा पाठिंबा असलेले नेते पुढे यायला हवेत. कारण आपण मोठ्या युद्धासाठी जात आहोत. मी सोशल मीडिया सिंधिया व पायलट यांच्यासोबतचे छायाचित्र पोस्ट केले आहे. त्यावरून भाजपवाले मी त्यांच्या पक्षात जात असल्याची अफवा पसरवू लागले आहेत. सिंधिया व पायलट हे दोघेही माझे चांगले नेते आहेत. ते दोन्ही चांगले नेते आहेत. परंतु मी काँग्रेस सोडणार नाही. पक्षात माझे केवळ दोन नेते आहेत. एक राहुल गांधी व दुसऱ्या प्रियंका गांधी. मात्र ही बाब मी जाहीरपणे सांगतो.

भाजप : सरकारला कुठपर्यंत आेलीस ठेवणार : प्रदेशाध्यक्ष

राजस्थानचे भाजपाध्यक्ष सतीश पूनिया यांनी काँग्रेसला टोला लगावला. ट्विटमध्ये ते म्हणाले, आमचा चित्रपट ‘ललकार’नंतर गहलोत यांचे काही मंत्री व आमदार बाहेर पडले खरे, परंतु त्यांच्यावर पोलिसांचा पहारा आहे. लोकशाहीबद्दल बोलणारे लोक मतदारसंघातील जनतेला भेटण्यासाठी आमदारांची कधी सुटका करतात हे पाहावे लागेल. सरकारला कुठपर्यंत आेलीस ठेवले जाणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

काँग्रेस : नवे प्रदेशाध्यक्ष म्हणाले- सरकार संपूर्ण पाच वर्षे टिकेल

राजस्थानचे नवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोविंद डोटासरा माध्यमांना म्हणाले, गहलाेत सरकार स्थिर आहे. ते पाच वर्षे पूर्ण करेल. कारस्थान पराभूत होईल. लोकशाही विजयी होईल. अशा कटाला उत्तर देण्यासाठी लवकरच विधानसभेचे विशेष सत्र बोलावले जाऊ शकते. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर डोटासरा पहिल्यांदाच काँग्रेस कार्यालयात गेले होते. बंडखोर आमदारांचा मुद्दा कोर्टात असल्याबद्दल विचारणा केली तेव्हा डोटासरा म्हणाले, या गोष्टी चालत असतात. सरकारला फरक पडत नाही.

सर्व अस्वस्थ, काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांची गर्दी

छायाचित्र जयपूरमधील राजस्थान काँग्रेस कार्यालयाचे आहे. एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नवे प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा येथे दाखल झाले तेव्हा कार्यकर्त्यांचा गराडा.