आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • High Court Comment On Live In Relationship | Marital Relationship Is Now Affected By 'use And Throw Away' Culture

लिव्ह -इन रिलेशनवर हायकोर्टाचे खडेबोल:वैवाहिक संबंध ‘वापरा आणि फेका’ संस्कृतीने प्रभावित, सामाजिक शांततेवर दुष्परिणाम

तिरुवनंतपुरमएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आजकाल तरुण पिढी विवाहाला कुप्रथा मानू लागली आहे. त्यामुळे मुक्त जीवनात अडथळा येताे, असे या पिढीला वाटू लागले आहे. त्यामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप वाढू लागल्याचे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. पतीने दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीत न्यायालयाने टिप्पणी केली.

केरळमध्ये वैवाहिक संबंध हे ‘वापरा आणि फेकून द्या’ अशा ग्राहक संस्कृतीवर आधारित वाटू लागले आहेत. असा वर्ग काेणतीही जबाबदारी न घेता जीवनाचा मुक्तपणे आनंद घेण्यासाठी विवाह टाळू लागला आहे, असे काेर्टाने म्हटले आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए. माेहंमद मुश्ताक व साेफी थाॅमस यांचे पीठ म्हणाले, एकेकाळी केरळ काैटुंबिक मूल्यांसाठी आेळखले जाई. आता मात्र तरुणांची स्वार्थातून किंवा कमकुवत मनामुळे अशी स्थिती दिसू लागली आहे. विवाहबाह्य संबंधासाठी अपत्यांची पर्वाही केली जात नाही. विवाह बंधन ताेडले जाते. त्याचा परिणाम समाजाच्या आराेग्यावर हाेईल. कारण आई-वडिलांमधील भांडण, हतबल घटस्फाेटित समुदाय बहुमतावर ताबा मिळवेल. सामाजिक शांततेवर त्याचा दुष्परिणाम हाेईल.

बातम्या आणखी आहेत...