आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • High Court Ordered The Immediate Release Of Dr. Kafeel Khan, Arrested For Provoking Speech

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

त्वरीत सुटका करा:भडकाऊ भाषणच्या आरोपात 6 महिन्यांपासून जेलमध्ये असलेल्या डॉ. कफील खान यांच्या सुटकेचे आदेश; अलाहाबाद हायकोर्टाचा निर्वाळा

प्रयागराज3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलाहाबाद हायकोर्टाने डॉ. कफील यांच्या त्वरीत सुटकेचे आदेश मंगळवारी जारी केले आहेत. ते गेल्या 6 महिन्यांपासून मथुरा येथील जेलमध्ये कैद आहेत. अलाहाबाद हायकोर्टाने कफील यांच्या विरोधात लावलेले राष्ट्रीय सुरक्षा कायदा (रासुका) अंतर्गत प्रतिबंधित करण्याचे प्रकरण सुद्धा रद्द केले आहे. त्यांच्या विरोधात रासुका लावणे आणि त्याची मर्यादा वाढवणे हे बेकायदेशीर असल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

हायकोर्टाने या प्रकरणाची ससुवावणी 28 ऑगस्ट रोजी सुनावणी पूर्ण करून निकाल राखीव ठेवला होता. डॉ. कफील यांच्यावर सीएए आणि एनआरसी यावर भडकाऊ भाषण दिल्याचा आरोप लावण्यात आला होता. अलीगडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरुद्ध राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत कारवाई केली होती. यानंतर या कारवाईच्या विरोधात डॉक्टर कफील यांच्या आई नुजहत परवीन यांनी अलाहाबाद उच्चा न्यायालयात दाद मागितली होती.

दोनदा वाढवण्यात आली कैद, 6 महिन्यांपासून जेलमध्ये

कफील खान यांना गोरखपूर येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून 29 जानेवारी 2020 रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांना तुरुंगात पाठवून त्यांच्याविरुद्धा रासुका लावण्यात आला होता. या दरम्यान दोनदा त्यांची कोठडी वाढवण्यात आली होती. न्यायालयाने या दोन्ही गोष्टी बेकायदेशीर ठरवल्या आहेत.

2017 मध्ये आले होते चर्चेत

डॉ. कफील खान 2017 मध्ये चर्चेत आले होते. त्यावेळी गोरखपूरच्या रुग्णालयात एका आठवड्यात 60 पेक्षा अधिक लहान मुलांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा गढ असलेल्या भागातील हा मुद्दा खूप चर्चेत आला. याचवेळी डॉ. खान यांना ससस्पेंड करण्यात आले. त्यांना इंसेफेलाइटिस वार्डमध्ये कर्तव्यात कसूर दाखवल्याचे आरोपी करण्यात आले होते. रुग्णालय सोडून ते खासगी सेवा देतात असेही आरोप केले होते. याच प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. उत्तर प्रदेश सरकारवर त्यांनी टीका केल्याने त्यांना लक्ष्य करण्यात आले अशीही चर्चा होती. परंतु, हायकोर्टाने आता कफील यांना मोठा दिलासा दिला आहे.