आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • High Court Seeks Reply From Gujarat Government On Morbi Incident, Latest News And Update

मच्छू ब्रिज दुर्घटना:हायकोर्टाने गुजरात सरकारकडून मागितले उत्तर, राज्य मानवाधिकार आयोगाचीही नोटीस

मोरबी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अवघ्या देशाचे हृदय पिळवटून टाकणाऱ्या मोरबी दुर्घटनेवर गुजरात उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. गुजरात सरकारला 14 नोव्हेंबरपर्यंत त्याचे उत्तर द्यायचे आहे. या प्रकरणी मोरबी नगरपालिका व राज्य मानवाधिकार आयोगालाही नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

गुजरातच्या मोरबी येथील झुलता पूल कोसळून 135 जणांचा जणांचा बळी गेला. मृतांत 50 हून अधिक मुलांचाही समावेश होता. 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी घडलेल्या या घटनेमुळे अवघा देश स्तब्ध झाला होता. गुजरात उच्च न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने सोमवारी या प्रकरणी राज्य सरकार, मोरबी नगरपालिका व राज्य मानवाधिकार आयोगाला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले.

मोरबी अपघात 3 पॉइंट्समध्ये...

1.पूल अपघात: क्षमतेहून अधिक लोक जमले

मोरबीतील झुलता पूल रविवारी 30 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.30 वा. कोसळला. 765 फूट लांब व केवळ 4.5 फूट रुंद असलेल्या पुलाची क्षमता केवळ 100 जणांची होती. पण त्यावर 500 हून अधिक जण जमले होते. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, तिथे एक हजारांहून अधिकजण जमले होते. 26 ऑक्टोबर रोजी हा पूल वाहतुकीसाठी खूला झाला होता. त्यानंतर पाचव्या दिवशीच तो कोसळला.

2. कारवाई: 9 जणांना अटक, 50 सदस्यीय टीमकडून चौकशी

या पुलाच्या दुरुस्तीची जबाबदारी ओरेवा ग्रुपकडे आहे. या ग्रुपने मार्च 2022 ते मार्च 2037 म्हणजे 15 वर्षांसाठी मोरबी नगरपालिकेशी एक करार केला आहे. गुजरात पोलिसांनी आपले 50 जणांचे पथक या घटनेची चौकशी करत असल्याचे सांगितले आहे. संबंधितांवर कलम 304, 308 व 114 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेप्रकरणी 9 जणांना अटक करण्यात आली असून, त्यात ओरेवा कंपनीच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

3. इन्व्हेस्टिगेशन: फोरेंसिक एक्सपर्टने सांगितले कारण

मोरबीचा केबल सस्पेंशन ब्रिज 20 फेब्रुवारी 1879 रोजी सुरू करण्यात आला होता. पूल 143 वर्ष जुना असल्यामुळे त्याची अनेकदा दुरुस्ती झाली आहे. नुकतीच 2 कोटी रुपये खर्चून 6 महिन्यांपर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. गुजराती नववर्ष म्हणजे 26 ऑक्टोबर रोजी हा पूल पुन्हा सुरू करण्यात आला होता. पण फिटनेस सर्टिफिकेट शिवायच तो सुरू करण्यात आला होता. न्यायवैद्यक सूत्रांच्या माहितीनुसार, पुलाचा जुना केबल ओझ्यामुळे तुटला.

बातम्या आणखी आहेत...