आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वीज बिलात डायनॅमिक प्रायसिंग:पीक अवरमध्ये जास्त वापर केला तर प्रत्येक युनिटमागे खर्च वाढेल

नवी दिल्ली / मुकेश कौशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्मार्ट मीटर विजेच्या बिलावर परिणाम दाखवू लागले आहे. ग्राहकांना यातून आपल्या वापरावर निगराणी ठेवण्याची सोय आहे. परंतु त्या तुलनेत बिलाची रक्कमही बदलणार आहे. स्मार्ट मीटर लावल्यानंतर लगेच ‘टाइम ऑफ डे’ आधारे शुल्क लावले जाईल. त्यात पीक डिमांड व कमी डिमांडच्या निकषांवर वीज युनिटचे दर बदलतील. वीज कायदा आणण्याएेवजी केंद्र सरकार जुन्या कायद्यांतर्गत नवीन नियम तयार करणार आहे. नवीन नियमांतर्गत स्मार्ट मीटरिंगनुसार वीज बिल येईल.

दिवसा कमी, रात्री जास्त स्मार्ट मीटरने वीज बिलातील बदलाचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार ग्राहकाचा स्वीकृत लोड डिमांडनुसार बदलणार आहे. म्हणजेच विजेचा वापर त्याचा स्वीकृत लोड वारंवार जास्त होत असल्यास पुढील वर्षात ती आकडेवारी आपोआप अद्ययावत होईल. ही प्रणाली लागू झाल्यानंतर सायंकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत पीक अवर्ससाठी जास्त शुल्क लागेल व दिवसा ते कमी असतील. केंद्राने ३१ मार्च २०२५ पर्यंत संपूर्ण देशात स्मार्ट मीटर लावणे अनिवार्य केले आहे. त्यामुळे हे बदल सुरू झाले आहेत.