आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Highway' Of Development By Levying Fines On Brewing, Consumption, Sale 11 Thousand To 51 Thousand Fines, 26 Thousand Recovered

मद्यनिर्मिती, प्राशन, विक्रीवर दंड आकारून विकासाचा राज‘मार्ग’:11 हजार ते 51 हजारांपर्यंत दंड, 26 हजार वसूल केले

शिवजी रॉय / कुशेश्वरस्थान (दरभंगा)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दरभंगा जिल्ह्यातील एका गावाने दारूबंदी मोडल्यानंतर दंड अकारून विकासाचे नवे उदाहरण सादर केले. गेल्या काही दिवसांत २६ हजारांहून जास्त दंड अकारून गावकऱ्यांनी दोन रस्त्यांचा कायापालट केला.

कुश्वेश्वरस्थानच्या सुघराईनमध्ये दारूबंदी अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच योगी मुखिया यांनी स्थानिक वकील राहुलकुमार यांच्या नेतृत्वात दारूबंदीचे नियम मोडल्यास दंड निश्चित केला. नियमांचे पालन होते की नाही, हे पाहण्यासाठी समिती स्थापन केली. लोक सर्वांना जागरूकही करत आहेत. दारू बनवणे, विकणे आणि पिण्यावर दंड आकारला जात आहे. दंडाच्या पैशातून गावात विकासकामे केली जातात. हे कठोर नियम लागू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. दारू बनवताना पकडल्यास ११ हजार रुपये, बाहेरून आणून दारू विकल्यास ५१ हजार रुपये आणि दारू पिताना सापडल्यास ५ हजार १०० रुपये दंड अकारण्यात आला. पंचायतीने बनवलेली समिती नियमांचे काटेकोर पालन करते. त्याशिवाय दररोज लोक फेरी काढून लोकांना दारूपासून दूर राहण्याचे आवाहन करतात. अभियानात सहभागी असलेल्या लोकांनी सांगितले की, ८ ऑक्टोबरपासून स्थानिक पातळीवर हे नियम लागू करण्यात आले. तेव्हापासून २६,३०० रुपये दंडाच्या रूपात वसूल झाले. या रकमेतून पुरात वाहून गेलेले दोन रस्ते बनवण्यात आले. दुसरा एक रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू आहे.

महिला, साधू-संतांचा पाठिंबा : दारूबंदीच्या समर्थनात लोकांच्या जागृती फेरीत महिलांसह प्रत्येक धर्माचे लोक सहभागी होतात. नुकताच वैष्णव साधू-संत औक रामानंदी मठाच्या संतांनी महंत सतन दास यांच्या नेतृत्वात फेरी काढून दारूबंदीला आपला पाठिंबा जाहीर केला.

आठ महिने पाऊस, पुराने वेढलेले असायचे सुघराईनमध्ये दारूबंदी प्रभावीपणे लागू होत नव्हती. त्याचे कारण म्हणजे वर्षातील ८ महिने येथील लोक पाऊस आणि पुराने वेढलेले असायचे. वेळेवर ना पोलिस पोहोचायचे ना अधिकारी. त्यामुळे दारूनिर्मिती, विक्री आणि सेवन बिनदिक्कत सुरू होते. हे रोखण्यासाठी लोकांनी हे अभियान सुरू केले.

बातम्या आणखी आहेत...