आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hijab Case | Bajrang Dal Leader Death Case | Marathi News | The Team Raised Rs 80 Lakh; The Muslim Community Is Also Ready To Help

हिजाब वाद : बजरंग दल कार्यकर्ता मृत्यू प्रकरण:संघाने उभारला 80 लाखांचा निधी; मुस्लिम समुदायही मदतीस तयार

​​​​​​​बंगळुरूहून विनय माधव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकमधील हिजाब वादानंतर शिवमाेगामध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्षच्या मृत्यूनंतर राजकारण तापू लागले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीपर्यंत हा मुद्दा जिवंत राहावा, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वाटते. त्यामुळेच हर्षच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी म्हणून आतापर्यंत ८० लाख रुपयांचा निधी उभारण्यात आला. आगामी काही दिवसांत आणखी तितकाच निधी गाेळा केला जाऊ शकताे. हर्षला हिंदू शहीद असा दर्जा मिळावा, अशा मागणीचीदेखील चर्चा आहे. अशा तयारीमुळे शहरातील स्थिती सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील हाेत चालली आहे.

एकीकडे भाजपचे आमदार आपल्या फंडातून मदत करू लागले आहेत, त्याचबराेबर सामान्य नागरिकांकडूनही निधी घेतला जात आहे. उच्च शिक्षण मंत्री डाॅ. अश्वथनारायण यांनी १० लाख रुपयांची देणगी या निधीसाठी ट्रस्टमार्फत दिली आहे. स्थानिक आमदार के.एस. ईश्वरप्पा, हाेनालीचे आमदार एम.पी. रेणुकाचार्य यांनी ५ लाख रुपये व इतर आमदारांनी एक ते दहा लाख रुपये हर्षच्या कुटुंबीयांच्या नावाने जमा केले आहेत. मुदीगेरे अलाेकमध्ये २० लाख रुपये उभारण्यात आले आहेत. संघाच्या या कवायतींची मुस्लिम समुदायालाही कल्पना आहे. म्हणूनच स्थानिक मुस्लिम संघाने हर्षच्या कुटुंबाची भेट घेऊन त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले. मुस्लिम संघाचे अध्यक्ष परवेज अहमद दैनिक भास्करला म्हणाले, आम्ही हर्षच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यास तयार आहाेत.

निकाल राखून ठेवला

कर्नाटक उच्च न्यायालयात हिजाब प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. तूर्त निकाल राखून ठेवण्यात आला आहे. मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती जे.एम. खाजी व न्यायमूर्ती के.एस. दीक्षित यांच्या पीठाने शुक्रवारी सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला. कर्नाटकमधील काही महाविद्यालयांत हिजाबवर प्रतिबंधास आव्हान देताना विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. नऊ फेब्रुवारी रोजी स्थापन झालेल्या पिठाने सुनावणी करताना विविध बाजू ऐकून घेतल्या. डिसेंबरमध्ये उडुपीमध्ये सरकारी पीयू कॉलेजमध्ये गणवेश परिधान केला नसल्याने काही विद्यार्थीनींना वर्गात प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली होती. या विद्यार्थीनींनी कॅम्पस फ्रंट ऑफ इंडियाची पत्रकार परिषद आयोजित करून विरोध दर्शवला होता.

बातम्या आणखी आहेत...