आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hijab Case India | Hijab Case Karnataka | Marathi News | Hijab Is A Matter Of Security; No Display Of Religious Fanaticism: Muslim Students

हिजाब वाद:हिजाब हा सुरक्षा-आस्थेचा विषय; धार्मिक कट्टरतेचे प्रदर्शन नाही : मुस्लिम विद्यार्थिनी

बंगळुरू/पाटणा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटक हायकोर्टात दुसऱ्या दिवशीही निकाल नाही, आजही सुरू राहील युक्तिवाद

कर्नाटकातून सुरू झालेल्या हिजाब वादावर कर्नाटक हायकोर्टात मंगळवारीही निकाल लागला नाही. या प्रकरणात बुधवारीही सुनावणी सुरू राहणार आहे. मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्या. कृष्णा एस. दीक्षित व न्या. जे.एम. खाजी यांच्या पीठासमोर मुस्लिम विद्यार्थिनींच्या वकिलांनी युक्तिवाद केले.

विद्यार्थिनींची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील देवदत्त कामत म्हणाले की, हिजाब धार्मिक कट्टरतेचे प्रदर्शन करण्याची परंपरा नाही. तो सुरक्षेची भावना व आस्थेेेेचा विषय आहे. त्यांच्या युक्तिवादानुसार, शाळांना ‘स्वैच्छिक अभिव्यक्ती’ची परवानगी दिली पाहिजे. गणवेशावर हिजाब घालण्याची मुभा दिल्याने ड्रेस कोडचे उल्लंघन होणार नाही. शाळांनी सकारात्मक पावले उचलली पाहिजेत. हिजाबला काही क्षणांसाठीही नाकारल्यास तिच्या धर्माला बाहेर ठेवले असून तिचे स्वागत केले नसल्याचा संदेश जाईल. कामत यांनी दक्षिण आफ्रिकेच्या कोर्टातील दक्षिण भारतीय वंशाच्या हिंदू मुलीशी संबंधित निकालाचाही उल्लेख केला. सोनाली पिल्लई शाळेत नथ घालू शकते का, हा मुद्दा दक्षिण आफ्रिकेच्या कोर्टात आला होता. तिला नथ घालण्यास बंदी आणणाऱ्या शाळेच्या आदेशाला सोनालीने कोर्टात आव्हान दिले हाेते.

बिहारमध्ये सर्व विद्यार्थी एकसारखा गणवेश घालतात, येथे प्रत्येक धर्माचा आदर : नितीश
हिजाब वादावर बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, राज्याच्या शाळांमध्ये सर्व मुले एकसारखाच गणवेश घालतात. इथे आम्ही प्रत्येक धर्माचा आदर करतो. मूर्ती बसवणे, आपापल्या पद्धतीने पूजा करणे, अशी प्रत्येकाची वेगळी पद्धत आहे. सर्वांच्या आपापल्या मान्यता आहेत.

  • सर्वांचे धार्मिक अधिकार सुरक्षित राहावेत, ही आपली धर्मनिरपेक्षता सुनिश्चित करते
  • वकील कामत यांनी मान्य केले की, भारताचे संविधान सकारात्मक धर्मनिरपेक्षतेचे अनुसरण करते. तुर्कीच्या धर्मनिरपेक्षतेसारखे नाही, जी नकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. ते म्हणाले, आपली धर्मनिरपेक्षता सर्वांचे धार्मिक अधिकार राहावे, याची सुनिश्चितता करते.

द. आफ्रिकेत नथ घातल्याबद्दल शाळेत येण्यापासून राेखलेल्या मुलीचा दिला दाखला
मुस्लिम विद्यार्थिनींचे वकील कामत म्हणाले, दक्षिण आफ्रिकेतील मुलीने कोर्टात खटला जिंकला होता. कोर्टाने निकालात म्हटले होते की, ‘सार्वजनिकरीत्या धर्म आणि संस्कृतीचे प्रदर्शन ‘भयावहतेची परेड’ नाही. उलट ते वैविध्याचे प्रदर्शन आहे. ती आपल्या शाळा तसेच परतफेड म्हणून आपल्या देशाला समृद्ध करेल.’ कर्नाटकच्या शिवमोगात मंगळवारी हिजाब वादामुळे एका विद्यार्थिनीने दहावीची परीक्षा देण्यास नकार दिला आणि ती घरी परतली.

रुद्राक्ष धारण वा माथ्यावर टिळा, भांगेत कुंकू भरणेही तशीच आस्था
वकील कामत यांच्या युक्तिवादानुसार, रुद्राक्ष घालणे वा कपाळावर टिळा किंवा कुंकू लावणेही तशाच प्रकारची आस्था आहे. हे लावून लोकांना परमात्माद्वारे सुरक्षा व सृष्टी निर्मात्याशी जवळीक साधल्याचे वाटते. हिजाबविरुद्ध कुणी शाल (भगवे उपरणे) घालत असेल तर हे केवळ धार्मिक ओळखीचे प्रदर्शन आहे की इतर काही? त्याला हे दाखवून द्यावे लागेल की जर ते वेद, उपनिषदे, शास्त्रांत स्वीकृत असेल तर त्याचे संरक्षण आपले कर्तव्य आहे. नसेल तर कलम २५ संरक्षण देत नाही.

बातम्या आणखी आहेत...