आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hijab Case | Karnataka Hijab Case | Court Desicion | Marathi News | Fourth Day Hearing In Karnataka High Court; No Veil, No Cross, No Turban, Being A Muslim Discriminates: Petitioner

हिजाब प्रकरण:कर्नाटक उच्च न्यायालयात चौथ्या दिवशी सुनावणी; घुंगट, क्रॉस, पगडीवर बंदी नाही, मुस्लिम असल्याने भेदभाव होतो : याचिकाकर्ता

बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • युक्तिवाद : समाजातील सर्व वर्गांत बांगड्यांसह अनेक धार्मिक चिन्हे

कर्नाटक हायकाेर्टात बुधवारी चाैथ्या दिवशी हिजाब बंदीविरुद्ध मुस्लिम विद्यार्थिनींच्या याचिकांवर सुनावणी झाली. मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्या. कृष्णा एस. दीक्षित व न्या. जे.एम. खाजी यांच्या पीठात याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी म्हटले की, लाेक घुंगट, दुपट्टा, पगडी, क्राॅस व टिकलीसारखे धार्मिक चिन्ह घालत आहेत, मग फक्त हिजाबवरूनच हा वाद उपस्थित केला जात आहे?

याचिकाकर्त्याचे वकील रविवर्मा कुमार म्हणाले, सर्वच वर्गांत अनेक धार्मिक चिन्हे आहेत. बांगड्या धार्मिक चिन्ह नाहीत का? बांगड्या घालणाऱ्या व टिकली लावणाऱ्या मुलींना बाहेर काढले जात नाही. क्राॅस घालणाऱ्यांवर बंदी नाही. लष्करात पगडी घालणारे असू शकतात, मग धार्मिक चिन्हासोबत वर्गात का बसता येत नाही? हा भेदभाव का? मुस्लिम मुलींना धर्माच्या आधारे वर्गातून बाहेर काढले जात आहे. हे घटनेच्या कलम १५ चे उल्लंघन आहे. बुधवारीही हिजाब घालणाऱ्या मुस्लिम विद्यार्थिनींना वर्गात जाऊ दिले नाही. हा भेदभाव आहे.

कोर्ट रूममध्ये सरकार आणि याचिकाकर्त्यांत असे झडले युक्तिवाद
कुमार : शिक्षण खात्याने सरकारी काॅलेजच्या गाइडलाइन्समध्ये कोणताही गणवेश ठरवून दिलेला नाही. गणवेश लादण्याबद्दल प्राचार्यांविरुद्ध कारवाईचा इशाराही दिला आहे. नियम, कायद्यात हिजाबवर कोणतीही बंदी नाही.
न्या. दीक्षित : नियमांत एखाद्या गोष्टीवर बंदी नसली म्हणजे, त्याला परवानगी आहे, असा त्याचा अर्थ होतो का? मग कुणी असेही म्हणू शकते की, वर्गात शस्त्र आणण्यासाठी कोणत्याही परवान्याची गरज नाही, कारण त्यावर बंदीच नाही.

कोर्ट : शैक्षणिक नियमांत गणवेश निर्धारित करता येत नाही का? कुमार : शैक्षणिक नियमांचा गणवेशाशी काहीही संबंध नाही. ते शिक्षक-विद्यार्थी प्रमाण, अभ्यासक्रमाशी संबंधित आहे.

ज्या कुटुंबात आते, मावस व सावत्र बहिणीशी विवाह होतो तेथे हिजाब वापरा : प्रज्ञा
भोपाळ | देशभर हिजाबवरून वाद सुरू असताना आता भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा यांनीही या वादात उडी घेतली आहे. त्या म्हणाल्या, ज्या कुटुंबात आते, मावस व सावत्र बहिणीशी विवाह होतो तेथे हिजाब वापरा. आमच्या सनातन धर्मात नारीपूजा होते. आम्हाला हिजाबची गरज नाही. अशा कुटुंबांत म्हातारपण लपवण्यासाठी महिला हिजाब वापरतात. त्या म्हणाल्या, तुम्ही सुंदर आहात की कुरूप, तुम्ही तुमच्या मदरशांत हिजाब लागू करा, नका करू. आम्हाला देणेघेणे नाही. शाळा-कॉलेजमधील वातावरण बिघडवाल तर हिंदूंना सहन होणार नाही.

कडेकोट सुरक्षेत उघडली काॅलेजेस, अनेक जागी हिजाबवरून वाद
कर्नाटकात हिजाब वादामुळे आठवडाभर बंद प्री-युनिव्हर्सिटी व डिग्री काॅलेज बुधवारी उघडले. अनेक ठिकाणी हिजाब घालून आलेल्या विद्यार्थिनींना तो काढल्यानंतरच प्रवेश देण्यात आला. अनेक महाविद्यालयांत वाद झाला. उडुपीत कलम १४४ लागू होते. पीयू काॅलेजचे प्राचार्य रुद्रे गाेडा म्हणाले, हिजाबवर बंदीला कोर्टात आव्हान देणाऱ्या विद्यार्थिनी कॉलेजमध्ये आल्या नाहीत. बहुतांश विद्यार्थिनी हिजाब काढूनच वर्गात आल्या. जिल्ह्यातील कुंडापूरच्या पीयू काॅलेजसह इतर काही संस्थांत २३ विद्यार्थिनी हिजाबवर अडून राहिल्याने त्यांना वर्गात जाण्यापासून रोखण्यात आले. मणिपालच्या एमजीएम काॅलेजला सुटी देण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...