आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hijab Case | Karnataka Hijab Case | Karnataka Hijab Case | Marathi News | The Hijab Is Not Necessarily Part Of The Religious Tradition, Argues The Karnataka Government; Sixth Day Hearing In Karnataka High Court

हिजाब प्रकरण:हिजाब वापरणे आवश्यक धार्मिक परंपरेचा भाग नाही, कर्नाटक सरकारचा युक्तिवाद; कर्नाटक उच्च न्यायालयात सहाव्या दिवशी सुनावणी

बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळा-महाविद्यालयांत हिजाबवरील बंदी प्रकरणीत कर्नाटक हायकाेर्टात सहाव्या दिवशीही सुनावणी सुरू राहिली. शुक्रवारी राज्य सरकारने बाजू मांडली. कर्नाटक सरकारकडून महाधिवक्ते (एजी) प्रभुलिंग नवदगी म्हणाले, हिजाब इस्लाममधील आवश्यक धार्मिक परंपरेचा भाग नाही. त्याचा वापर राेखणे धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या घटनेच्या कलम २५ चे उल्लंघनही नाही.

प्राध्यापिकेचा राजीनामा : कर्नाटकातील हिजाब वादादरम्यान तुमकूरच्या जैन पीयू महाविद्यालयात इंग्रजीच्या सहायक प्रोफेसर चांदनी यांनी शुक्रवारी राजीनामा दिला. त्या म्हणाल्या, “मी या कॉलेजमध्ये ३ वर्षांपासून आहे. आजवर कोणतीही अडचण नव्हती. अध्यापनादरम्यान कोणतेही धार्मिक प्रतीक घालता येणार नसल्याचे गुरुवारी प्राचार्यांनी सांगितले.’ दरम्यान, प्राचार्यांनी हा आरोप फेटाळला आहे.

लाइव्ह स्ट्रीमिंगवर बंदीची मागणी फेटाळली
तत्पूर्वी हायकाेर्टाने प्रकरणाच्या सुनावणीच्या थेट प्रसारणावर बंदीची मागणी करणारी याचिका फेटाळली. सुनावणी सुरू झाल्यानंतर विद्यार्थिनींकडून सादर वकील रवी वर्मा म्हणाले, लाइव्ह स्ट्रीमिंगमुळे समाजात अशांतता निर्माण होत आहे. कोर्टात करण्यात आलेल्या टिप्पण्यांच्या संदर्भाचा गैरअर्थ काढण्यात आला. यामुळे मुलांवर मानसिक दबाव येत आहे. त्यावर मुख्य न्यायमूर्ती अवस्थी म्हणाले, “प्रतिवाद्यांचा कल काय आहे हे लाेकांना कळू द्यावे.’

बातम्या आणखी आहेत...