आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hijab Case | Karnataka Hijab Case | Marathi News | Hijab Is Not Banned By The Government, It Depends On The Rules Of Educational Institutions; No Ban On Educational Institutions, Karnataka Government's Explanation In The High Court

हिजाब प्रकरण:हिजाबवर सरकारकडून बंदी नाही, ती शिक्षण संस्थांच्या नियमांवर अवलंबून; शैक्षणिक संस्थाबाहेर बंदी नाही

बंगळुरू6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्नाटक विधान परिषदेत काँग्रेसच्या आमदारांनी घोषणाबाजी केली.

हिजाब प्रकरणात सुनावणी सुरू असतानाच कर्नाटक सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात सांगितले की, संस्थेच्या शिस्तीच्या कक्षेत हिजाब घालण्यावर कुठलीही बंदी नाही. मुख्य न्यायमूर्ती रितुराज अवस्थी, न्यायमूर्ती जे. एम. खाजी आणि न्यायमूर्ती के. एम. दीक्षित यांच्या खंडपीठात हिजाबवरील बंदीच्या विरोधात उडुपीच्या विद्यार्थिनींच्या याचिकांवर सुनावणी सुरू आहे. या आठवड्यात सुनावणी पूर्ण करण्याची आमची इच्छा आहे, असे खंडपीठाने म्हटले.

राज्य सरकारची बाजू मांडताना महाधिवक्ता प्रभुलिंग नवादगी म्हणाले की, सध्याच्या प्रकरणात शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी आहे, बाहेर कुठेही नाही.

भावावर हल्ला झाला, याचिकाकर्तीचा आरोप
हिजाबवरील बंदीला आव्हान देणाऱ्या याचिकाकर्त्यांपैकी एका विद्यार्थिनीने आपला भाऊ आणि वडिलांवर हल्ला आणि त्यांच्या हॉटेलमध्ये तोडफोड केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी मालपे ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवमोगा हत्येप्रकरणी सहा जणांना अटक
शिवमोगा येथील बजरंग दल कार्यकर्ता हर्षाच्या हत्येच्या आरोपावरून पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. त्यात कासीम, नदीम, आसिफ आणि रिहान यांचा समावेश आहे.

हिजाब धार्मिक परंपरा आहे की सांस्कृतिक?
याचिकांत आरोपित काही प्राध्यापकांतर्फे युक्तिवाद करणारे वकील एस. एस. नागानंद यांनी, हिजाब ही धार्मिक परंपरा आहे की सांस्कृतिक, असा प्रश्न उपस्थित केला. अनिवार्य धार्मिक परंपरा आणि धर्मासाठी अनिवार्य सांस्कृतिक परंपरा या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. इस्लाममध्ये पाच वेळेच्या नमाजाचा उल्लेख आहे. मी त्याचा सन्मान करतो. मी स्कूटरवर जात आहे. समोर मशीद आहे आणि अजान सुरू आहे, तर मग रस्त्यावर नमाज पढला पाहिजे का? तुमचे धर्मपालन इतरांच्या मार्गात येत असेल तर काय होईल?

बातम्या आणखी आहेत...