आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमधील हिजाब प्रकरणाचे पडसाद संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. या घटनाचा अनेक सर्वसामान्यांसह राजकीय पक्ष देखील निषेध करत आहे. दरम्यान कर्नाटकच्या उडुपी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयाच्या आसपासच्या परिसरात 14 फेब्रुवारीपासून 19 फेब्रुवारीपर्यंत कलम 144 लागू केले आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालय परिसरात सुमारे 200 मीटरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहे. याकाळात मोर्चे आणि आंदोलनावर देखील बंदी असणार आहे.
उडुपीमध्ये कलम 144
उडुपी जिल्हा प्रशासनाने उद्यापासून म्हणजेच 14 फेब्रुवारीच्या सकाळी 6 पासून 19 फेब्रुवारी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कलम 144 लागू केले आहे. या आदेशानुसार या परिसरातील शाळा, महाविद्यालयातील 200 मीटर अंतरामध्ये पाचपेक्षा जास्त जण एकत्रित येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. सोबतच निदर्शने आणि रॅली, घोषणाबाजी करणे, गाणी म्हणणे किंवा भाषण करणे यावर कडक बंदी असेल.
... म्हणून घेतला निर्णय
सोमवारपासून शाळा पुन्हा सुरू होणार असल्याने खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी पुन्हा निदर्शने करू नये या पार्श्वभूमीवर कलम 144 लागू करण्यात आली आहे. कलम 144 लागू झाल्यानंतर पुतळे जाळणे, फटाके जाळणे, शस्त्रे आणि दगड बाळगणे किंवा दाखवणे, सार्वजनिक ठिकाणी मिठाई वाटणे आणि सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही प्रकारचे असभ्य वर्तन करण्यास मनाई असेल,
या वादावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सुरू
कर्नाटक हायकोर्टाने हिजाब वादावर सुनावणी करताना गुरुवारी आदेश दिला होता की, अंतिम आदेश येईपर्यंत विद्यार्थ्यांसाठी कोणतेही धार्मिक चिन्ह वापरण्यास परवानगी नाही. हायकोर्टाच्या या अंतरिम आदेशानंतर आता शाळा-महाविद्यालयांमध्ये हिजाब आणि भगव्या शालीचा वापर बंद करावा लागणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे की, राज्यात शांतता परत येणे आवश्यक आहे आणि शाळा आणि महाविद्यालये लवकर उघडली पाहिजेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.