आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटकमध्ये हिजाबचा वाद व त्यावर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर सोमवारपासून दहावीपर्यंतचे वर्ग सुरू होतील. राज्यात जनजीवन सुरळीत होईल. आता विद्यार्थी शांततेने अभ्यासाला लागतील, असा विश्वास मुख्यमंत्री बी. आर. बोम्मई यांनी व्यक्त केला आहे.
महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय याबाबतचा अहवाल मिळाल्यानंतर घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडून सद्य:स्थितीचा अहवाल मागवला आहे. उडुपी जिल्हा प्रशासनानेदेखील सोमवारपासून १९ फेब्रुवारीपर्यंत कलम १४४ लागू केले आहे. शाळेच्या या कक्षेत पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोकांना एकत्रित आणणे, जाहीर सभा घेणे, घोषणाबाजी, भाषण देण्यावर कडक कारवाई करण्यात आली आहे. उडुपीपासूनच हिजाबवादाला सुरुवात झाली. उच्च न्यायालयाने हिजाबवरील बंदीला आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर निर्णय देताना शिक्षण संस्थांमध्ये हिजाब किंवा भगवा स्कार्फ परिधान करणे किंवा धार्मिक झेंडा लावण्यास मनाई केली आहे.
परदेशी हात, इतर संघटनांची भूमिका
मुख्यमंत्री म्हणाले, मीडिया किंवा साेशल मीडियावर हिजाब प्रकरणात परदेशी हात व काही संघटनांची भूमिका असल्याचा दावा केला जात आहे. तपास अधिकारी याबाबत मागावर आहेत. विधानसभेचे अधिवेशन साेमवारपासून सुरू होणार आहे. हिजाबसह अनेक मुद्द्यांवर घेरण्याची तयारी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.