आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Female Journalist Oriana Had Thrown Off The Hijab In Front Of Iranian Religious Leader Khomeini, US China Leaders Were Also Scared

इराणमध्ये हिजाबवरून गोंधळ:महिला पत्रकार ओरियानाने इराणचे धर्मगुरू खोमेनी यांच्यासमोर ​​​​​​​फेकून दिला होता हिजाब, नेत्यांनाही भीती

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इराणमध्ये आजकाल महिला रस्त्यावर हिजाब जाळत आहेत. हिजाबला विरोध करणे सुरू का झाले. यामागचे कारण म्हणजे एका 22 वर्षीय मुलीला हिजाब नीट न घातल्यामुळे इस्लामिक पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्या मुलीला कोठडीत मारहाण करण्यात आली.

त्यात त्या मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला, त्यानंतर इराणच्या महिलांचा राग अनावर झाला आणि महिलांनी हिजाब विरूद्ध आंदोलन सुरू केले

1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणमध्ये कठोर सिरिया कायदा लागू करण्यात आला होता. त्यापूर्वी इराणमध्ये महिलांना खूप स्वातंत्र्य होते.

अमेरिकन पत्रकाराने इराणच्या राष्ट्राध्यक्षांसमोर डोके झाकण्यास नकार दिला. तिच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत आहे.
अमेरिकन पत्रकाराने इराणच्या राष्ट्राध्यक्षांसमोर डोके झाकण्यास नकार दिला. तिच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत आहे.

महिला पत्रकाराने दाखवले धाडस, इराणच्या राष्ट्राध्यक्षांसमोर डोके झाकण्यास दिला नकार

इराणमध्ये झालेल्या या गदारोळ दरम्यान राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रइसी संयुक्त राष्ट्रांच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अमेरिकेला गेले आहेत. तिथे त्यांची CNN न्यूजला मुलाखत होणार होती.

पण CNN ची महिला पत्रकार क्रिस्टियन एमनपॉर हिला डोके झाकण्यास सांगण्यात आले. क्रिस्टियनने नकार दिल्यानंतर इराणी अधिकाऱ्यांनी मुलाखत रद्द केली. क्रिस्टियन एमनपॉरच्या या धाडसाचे जगभरातून कौतुक होत आहे.

एकदा एका महिला पत्रकाराने अयातुल्ला खोमेनी यांच्यासमोर हिजाब फेकून दिला होता

क्रिस्टियन एमनपॉरच्या आधीही एक महिला पत्रकार झाली आहे जिने इराणी इस्लामिक क्रांतीचे नेते अयातुल्ला खोमेनी यांच्यासमोर तिचा हिजाब काढून फेकून दिला होता.

जगातील सर्व बड्या नेत्यांना आणि हुकूमशहांना निर्भयपणे प्रश्न विचारणारी ओरियाना फलाची असे सांगते की मी देवांची मुलाखत घेताना त्यांनाही प्रश्न विचारून त्रास देऊ शकते.

ओरियाना फलाचीचे कार्य त्यांच्या दृष्टिकोनाची साक्ष देतात. पत्रकार म्हणून त्यांनी बडे नेते, हुकूमशहा, सेनापती यांच्यापुढे झुकण्यास नकार दिला. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी त्यांचे वैयक्तिक संबंध होते.

ओरियाना फलाची यांची 1960 ते 1980 च्या दशकातील महान पत्रकारांमध्ये गणना होते. त्यांनी जगभरातील युद्ध, क्रांती आणि राजकीय घडामोडींची रिपोर्टिंग केली आहे.पुढे त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

1979 मध्ये इटालियन पत्रकार ओरियाना फलाची यांनी खोमेनी यांच्या मुलाखतीदरम्यान हिजाब काढला होता.
1979 मध्ये इटालियन पत्रकार ओरियाना फलाची यांनी खोमेनी यांच्या मुलाखतीदरम्यान हिजाब काढला होता.

इटलीमध्ये झाला जन्म, वडिलांसोबत मुसोलिनीशी दिला लढा

ओरियाना फलाचीचा जन्म 1929 मध्ये इटलीतील फ्लोरेन्स येथे झाला. त्यावेळी इटलीवर फॅसिस्ट हुकूमशहा मुसोलिनीचे राज्य होते. ओरियानाचे वडील व्यवसायाने सुतार होते. पण नंतर त्यांनी फॅसिझमच्या विरोधात क्रांतिकारी कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. अगदी लहान वयातच ओरियानाने तिच्या वडिलांना साथ देण्यास सुरुवात केली.

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ती मुसोलिनीविरोधी क्रांतिकारकांचे गुप्त संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवत असे. काहीवेळा या संदेशांमध्ये हँडग्रेनेडसारख्या शस्त्रास्त्रेसुद्धा असायची. येथूनच ओरियानाने पत्रकारितेत रस घेण्यास सुरुवात केली.

सिनेसृष्टीतील लोक नाराज झाल्यावर संपादकांनी राजकारण्यांवर सोडले ‘गनिमी पत्रकार’

2006 मध्ये ओरियानाच्या मृत्यूनंतर, न्यूयॉर्क टाइम्सने तिच्यावर प्रोफाइल स्टोरी केली. यामध्ये त्यांना 'गनिमी पत्रकार' म्हणून दाखवण्यात आले होते.

ओरियाना फलाचीची गणना जगातील सर्वात निडर आणि स्पष्टवक्ते पत्रकारांमध्ये केली जाते. विशेष म्हणजे त्यांनी पत्रकारिता सुरू केली तेव्हा हा पूर्णतः पुरुषी पेशा मानला जात होता. ओरियाना फलाची यांनाही सुरुवातीला चित्रपटांवर लिहिण्यास सांगितले होते.

ओरियाना एकदा प्रसिद्ध इटालियन अभिनेत्री जीना लोलोब्रिगिडा हिच्या मुलाखतीसाठी गेली होती. तिने मुलाखतीची सुरुवात अशा शब्दात केली- मला तूम्ही तितक्या मुर्ख वाटत नाही जेवढे लोक तूम्हाला समझतात.यानंतर ओरियानाने तिच्या मुलाखतीद्वारे सेलेब्रिटींना हैरान करून सोडू लागली. त्यानंतर संपादकांनी तिला वरचढ आणि राजकारणात मुरलेल्या नेत्यांच्या मागे सोडले. नंतर, ओरियाना फलाची त्यांच्या पत्रकारितेच्या करिअरसाठी अमेरिकेत आली.

ओरियाना फॅलाचीने जगातील सर्व प्रमुख नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या बेधडक प्रश्नांनी नेते धास्तावून जात असत
ओरियाना फॅलाचीने जगातील सर्व प्रमुख नेत्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांच्या बेधडक प्रश्नांनी नेते धास्तावून जात असत

इराणचे सर्वात मोठे इमाम खोमेनी यांच्यासमोर हिजाब फेकले

1979 च्या इस्लामिक क्रांतीनंतर इराणची सत्ता सर्वोच्च शिया धर्मगुरू अयातुल्ला खोमेनी यांच्या हातात गेली. ओरियाना फलाची त्यांची मुलाखत घेण्यासाठी इराणला गेली होती. मुलाखतीपूर्वी त्यांना संपूर्ण शरीर झाकण्यास सांगितले होते. इमामच्या घरी सुरू असलेल्या या मुलाखतीचे नंतर भांडणात रूपांतर झाले.

महिलांबाबत इमामच्या विचारसरणीमुळे संतापलेल्या ओरियानाने त्यांच्यासमोरच हिजाब काढून फेकला आणि म्हणाली - 'मला हा मध्ययुगीन पोशाख आणि विचार सहन होत नाही.'

ओरियाना फलाचीने युद्ध आणि राजकीय रिपोर्टिंगमध्ये मोठे स्थान प्राप्त केले होते. पुढे त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.
ओरियाना फलाचीने युद्ध आणि राजकीय रिपोर्टिंगमध्ये मोठे स्थान प्राप्त केले होते. पुढे त्यांनी अनेक पुस्तकेही लिहिली.

हुकूमशहा गद्दाफीला म्हणाली - तुम्हाला माहिती आहे का, लोकांना तुम्ही आवडत नाही

ओरियाना फलाचीचीच्या चरित्रात, 'ओरियाना फलाची: द जर्नलिस्ट, द एजिटेटर, द लिजेंड', यात क्रिस्टिना डी स्टेफानो यांनी अनेक रंजक घटनांचा उल्लेख केला आहे. लिबियाचा क्रूर हुकूमशहा कर्नल मुहम्मद गद्दाफी यांची मुलाखत घेताना त्यांनी धाडसाने विचारले, 'तुम्हाला माहीत आहे का, लोकांना तुम्ही आवडत नाहीत आणि काही लोक तर तुमचा तिरस्कारही करतात.' असेच अमेरिकेचे तत्कालीन परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी ओरियानाने घेतलेल्या मुलाखतीला माझ्या आयुष्यातील सर्वात भीतीदायक मुलाखत होती असे सांगीतले.

लिहिताना कुणी डिस्टर्ब करू नये, म्हणून केलं नाही लग्न

ओरियाना यांनी लग्न केले नाही. लिहिताना कोणीतरी आपल्याभोवती घिरट्या घालते हे त्यांना आवडायचे नाही. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत ओरियानाने एका मुलाखतीत सांगितले की, लग्न झाल्यानंतर ती आपल्या मुलांना आणि पतीला तिच्याकडे येण्यापासून रोखू शकली नसती, म्हणूनच तिने लग्न केले नाही.

राजकारण्यांचा तिरस्कार करणाऱ्या ओरियाना फलाची यांना इंदिरा गांधी आवडायची

ओरियानाने जगभरातील सर्व बड्या नेत्यांची मुलाखती सह आपल्या देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही मुलाखत घेतली होती. सामान्यतः नेत्यांना कठोर स्वरात प्रश्न विचारून अस्वस्थ करणाऱ्या ओरियानाला मात्र इंदिरा गांधी आवडायच्या.