आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनाली, सिमल्यात 70% हॉटेल बुक:उन्हाळ्यापूर्वीच पर्यटकांच्या वर्दळीने ‘हिमाचल’ फुलले!

सिमला/मनाली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचलमधील उन्हाळी हंगाम साधारणपणे १५ एप्रिलपासून सुरू होतो. हवामानाच्या कृपेमुळे या वेळी पर्यटन व्यवसायाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हंगामापूर्वी पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी लोकांनी आगाऊ बुकिंग सुरू केले आहे. ७० टक्के हॉटेल्स बुक झाली आहेत. हॉटेल इंडस्ट्री असो.चे अध्यक्ष महेंद्र सेठ म्हणाले, सिमल्यातील हॉटेल्समध्ये ७०% आगाऊ बुकिंग झाले. ऊन वाढताच पर्यटन व्यवसायाला गती मिळेल. गेल्या दोन दिवसांत ३०,००० वाहने सिमल्यात दाखल झाली आहेत. धर्मशाला, मॅक्लॉडगंजमध्येही पर्यटकांची आवक वाढली आहे.

लाहौल खोऱ्यातील सौंदर्य पर्यटकांना करतेय आकर्षित अटल बोगद्याच्या निर्मितीनंतर लाहौल खोऱ्याचे सौंदर्य पर्यटकांना आकर्षित करू लागले आहे. शिवाय चंद्रा खोरे, सिस्सू सरोवर, केलांग, जिस्पा व दारचा, उदयपूर पर्यटकांना खूप आवडत आहे. शनिवारी ५ हजारांहून अधिक वाहने अटल बोगद्यामार्गे रोहतांगला गेली आहेत.