आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Himachal Got Cm With Mustache For First Time; Virbhadra Singh | Sukhvinder Singh Sukhu

हिमाचलला प्रथमच 'मिशी'वाला मुख्यमंत्री:धूमल-वीरभद्रसह 6 मुख्यमंत्र्यांना नव्हत्या मिशा; सुखविंदर सुक्खूंनी मोडली परंपरा

शिमला4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिमाचल प्रदेशाला प्रथमच मिशीवाला मुख्यमंत्री मिळाला आहे. सुखविंदर सिंह सुक्खू (SSS) यांच्यापूर्वी राज्याला 6 मुख्यमंत्री मिळाले. पण एकालाही मिशी नव्हती. आता मिशीवाल्या सुक्खूंनी ही परंपरा मोडित काढत हिमाचलची सूत्रे हाती घेतली.

हिमाचलची स्थापना 25 जानेवारी 1971 रोजी झाली. त्यानंतर 1952 मध्ये डॉक्टर यशवंत सिंह परमार राज्याचे पहिले मुख्यमंत्री बनले. त्यांनी 2वेळा राज्याची सूत्रे सांभाळली. त्यानंतर दोनदा ठाकूर रामलाल मुख्यमंत्री झाले. एवढेच नाही तर भाजप नेते शांता कुमार व प्रेम कुमार धूमल यांनीही दोनवेळा हिमाचल प्रदेशाचे नेतृत्व केले.

जयराम ठाकूर यांनी एकदा, तर दिवंगत वीरभद्र सिंह यांनी तब्बल 6 वेळा मुख्यमंत्री म्हणून हिमाचलचे नेतृत्व केले. या 70 वर्षांत एकदाही राज्याला मिशीवाला मुख्यमंत्री मिळाला नाही. यावेळी प्रथमच मिशी असणारा नेता मुख्यमंत्रीपदी विराजमान झाला आहे. 2017 मध्ये मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या जयराम ठाकूर यांना काहीशी मिशी होती. पण मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच त्यांनी त्या काढून टाकल्या.

CR पासून CM पर्यंतचा प्रवास

सुखविंदर सिंह सुक्खू पद व गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर राज्याचे 7वे मुख्यमंत्री झाले. त्यांनी शिमल्याील एका महाविद्यालयात CR म्हणजे क्लास रिप्रेझेंटेटिव्हची निवडणूक लढवून आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात केली. त्यानंतर ते NSUI, युवक काँग्रेस व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बनले. मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यापूर्वी ते काँग्रेसच्या निवडणूक प्रचार समितीचे अध्यक्षपदी होते. ते यंदा चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेत.

बातम्या आणखी आहेत...